Rabi Season Seeds Scheme : अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभागामार्फत हरभरा व गव्हाच्या बियाण्याचे सवलतीच्या दरात वितरण सुरू करण्यात आले आहे. (Rabi Season Seeds Scheme)
एकूण ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक शेतकऱ्याला एक हेक्टरच्या मर्यादेत सातबारावर बियाणे देण्यात येत आहे.(Rabi Season Seeds Scheme)
यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात तब्बल ३ हजार ८०५ क्विंटल हरभरा आणि गव्हाच्या बियाण्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. (Rabi Season Seeds Scheme)
२७ ऑक्टोबरपासून हे वाटप जिल्ह्यातील अधिकृत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर सुरू झाले असून, शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.(Rabi Season Seeds Scheme)
रब्बी हंगामाची तयारी जोरात
हिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर रब्बी पिकांची सार्वत्रिक पेरणी काही दिवसांत सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने 'कृषी उन्नती योजना' अंतर्गत हरभरा आणि गव्हाच्या बियाण्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
सवलतीच्या दराने उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देऊन, पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवणे हा विभागाचा उद्देश आहे.
तालुकानिहाय बियाणे वितरणाचे उद्दिष्ट
| तालुका | हरभरा (क्विंटल) | गहू (क्विंटल) |
|---|---|---|
| अकोला | २२५ | ३२० |
| बार्शिटाकळी | २२५ | ३२० |
| मूर्तिजापूर | २२५ | ३१८ |
| अकोट | २३५ | ३५२ |
| तेल्हारा | २२५ | ३२० |
| बाळापूर | २२० | ३०० |
| पातूर | २२० | — |
| एकूण | १,५७५ क्विंटल | २,२३० क्विंटल |
शेतकऱ्यांसाठी नियम आणि प्रक्रिया
प्रत्येक शेतकऱ्याला एक हेक्टरच्या मर्यादेत ६० किलो बियाणे सातबारावर सवलतीच्या दरात देण्यात येत आहे. ही सुविधा केवळ अधिकृत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर उपलब्ध असून, वाटपाची नोंद 'साथी पोर्टल'वर नोंदवली जात आहे.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना प्रमाणित व सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. बियाणे वाटप २७ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून, सर्व तालुक्यांत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे मिळेल.- हरिष देशमुख, कृषी उपसंचालक
शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक
अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, सवलतीच्या बियाण्यांमुळे खर्चात बचत होणार असल्याचे सांगितले आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे रब्बी हंगामात उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दोन्ही वाढण्याची अपेक्षा आहे.
