मोरेश्वर मानापुरे
शेतकऱ्यांना डाळींपासून अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि प्रथिन उत्पादनात नवी दिशा देण्यासाठी नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिलं 'पल्सेस प्रोटीन पार्क' (Pulses Protein Park) साकार होणार आहे.
२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक केंद्रामुळे तब्बल १० हजार शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून त्यांना त्यांच्या डाळींचं मूल्यवर्धन करून चांगला दर मिळणार आहे.(Pulses Protein Park)
नागपुरात भंडारा रोडवर 'पल्सेस प्रोटीन पार्क' उभे राहणार आहे. पार्ककरिता राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. हे महाराष्ट्रातील पहिलेच पार्क राहील. (Pulses Protein Park)
'पल्सेस प्रोटीन पार्क' म्हणजे डाळींपासून बनवलेल्या प्रथिने उत्पादनांसाठी एक विशेष क्षेत्र किंवा केंद्र. अशा क्षेत्रात डाळींमधून प्रथिने काढली जातील, प्रक्रिया केली जाईल आणि विविध उत्पादनांमध्ये वापरण्यासाठी तयार केली जातील. (Pulses Protein Park)
अशी आहे 'पल्सेस प्रोटीन पार्क'ची संकल्पना
* माती ते बियांच्या विकासापर्यंत विविध प्रक्रिया.
* शेतकऱ्यांसाठी सामायिक सुविधा केंद्र.
* डाळींतून प्रथिने काढण्यासाठी आधुनिक मशीनची उभारणी.
* पाळीव प्राणी आणि माशांसाठी उच्च प्रथिनेयुक्त उत्पादनांची निर्मिती.
* डाळींची लागवड आणि उच्च प्रथिने निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण.
* प्रधान कृषी सचिवांची दाल मिल क्लस्टरला भेट
राज्य सरकारच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अलीकडेच नागपूर दाल मिल क्लस्टरला भेट दिली. त्यावेळी रस्तोगी यांच्यासोबत समूहाने 'पल्सेस प्रोटीन पार्क' संदर्भात विस्तृत चर्चा केली. यासंदर्भातील प्रकल्प अहवाल आधीच तयार असल्याचे त्यांना सांगितले.
पार्क उभारणीसाठी त्यांनी होकार दिला असून, प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यास सांगितले. समूहाने पार्ककरिता जागेची पाहणी सुरू केली आहे.
शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा
या पार्कच्या उभारणीतून ५ ते १० हजार शेतकऱ्यांना थेट जोडले जाणार आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या तूर, हरभरा, मूग, मसूर, उडीद, वाटाणा या डाळींना चांगला दर मिळणार असून याच डाळींपासून प्रथिनयुक्त विविध उत्पादनं तयार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. यामुळे शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सेवा मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे.
डाळींचा खऱ्या अर्थाने 'मूल्यवर्धन'
डाळींपासून प्रथिनं वेगळी करण्यासाठी आधुनिक प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांचं पोषणमूल्य आणि बाजारमूल्य दोन्ही वाढणार आहे. नैसर्गिकरीत्या डाळींमध्ये १४ ते ३९% प्रथिनं असतात. त्यांचे विविध उत्पादनांमध्ये रूपांतर केल्यास शेतकऱ्यांचा नफा वाढून त्यांना आर्थिक बळकटी मिळणार आहे.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा उपक्रम
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला चांगला दर मिळेल, प्रक्रिया सुविधांचा लाभ होईल आणि प्रथिन उत्पादनातील नवे बाजार उघडतील. हे पार्क म्हणजे राज्य सरकारच्या 'आत्मनिर्भर शेतकरी' या व्हिजनचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
डाळींमध्ये नैसर्गिकरीत्या १४ ते ३९ टक्के प्रथिने असतात. त्याचे मूल्यवर्धन होण्यासाठी 'पल्सेस प्रोटीन पार्क' उभारण्यात येणार आहे. ५ ते १० हजार शेतकरी पार्कसोबत जुळतील आणि डाळींपासून मूल्यवर्धित प्रथिनांची निर्मिती करतील. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल. पार्कमध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध राहील. पार्क लवकर उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- मनोहर भोजवानी, अध्यक्ष, नागपूर दाल मिल क्लस्टर
हे ही वाचा सविस्तर : शेतकरी कंपन्या झाल्या हायटेक, आता शेतीही डिजिटल, योजनाही स्मार्ट