पुणे : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग होतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन राज्य सरकारकडून गौरव केला जातो. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर पीक स्पर्धा घेण्यात येते.
रब्बी हंगामातही अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, त्यात सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. राज्य स्तरावर उत्पादनकर्त्या प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. उत्पादनात मोलाची भर पडेल, असा कृषी विभागाचा उद्देश आहे.
किती मिळणार बक्षिसे
या स्पर्धा राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर घेतल्या जाणार आहेत त्या अनुषंगाने राज्य पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी ५० हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी ४० हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ३० हजार रुपये बक्षीस राहील.
तसेच जिल्हा पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी १० हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी ०७ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ०४ हजार रुपये आणि तालुका पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी ०४ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी ०३ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ०२ हजार रुपये बक्षीस आहे.
सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे
- प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
- सातबारा व आठ अ चा उतारा
- जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)
- ७/१२ उताऱ्यावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा
- चिन्हांकित केलेला नकाशा
- बँक खाते चेक पासबुकची छायांकित प्रत.
किमान एक एकरची मर्यादा:
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांचा समावेश केला आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. सहभागी शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी साधावा.
- रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, पुणे
