हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती प्रक्रिया https://hingolipp.recruitonline.in या अधिकृत संकेतस्थळावर राबविण्यात येणार आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारीपासून ते २६ जानेवारीपर्यंत
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये तर मागास प्रवर्गासाठी ८०० रुपये
शैक्षणिक अहर्ता
या पदासाठी उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक
संबंधित गावाचा रहिवासी असावा. (वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक).
२६ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक
इतर महत्वाच्या तारखा
पात्र व अपात्र उमेदवारांची छाननी करून यादी २६ जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
पात्र उमेदवारांना १ फेब्रुवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येईल.
लेखी परीक्षा ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
परीक्षेनंतरची प्रक्रिया
प्रथम उत्तरतालिका - ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध
अंतिम उत्तरतालिका - १० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध आणि लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल.
कागदपत्र तपासणी व मुलाखती ११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
पोलीस पाटील भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर जाहिरात https://hingolipp.recruitonline.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
