Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > PM Kisan : पीएम किसानचा पुढील हफ्ता 'या' तारखेनंतर मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

PM Kisan : पीएम किसानचा पुढील हफ्ता 'या' तारखेनंतर मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Latest News PM Kisan's next 20th installment weekly payment is received after 15 june 2025, read in detail | PM Kisan : पीएम किसानचा पुढील हफ्ता 'या' तारखेनंतर मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

PM Kisan : पीएम किसानचा पुढील हफ्ता 'या' तारखेनंतर मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

PM Kisan Scheme : खरिप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) हफ्त्याची ओढ आहे.

PM Kisan Scheme : खरिप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) हफ्त्याची ओढ आहे.

PM Kisan Scheme :  पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) पुढील म्हनजेच २० व्या हफ्त्याबाबत अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. जून २०२५ मध्ये हा हफ्ता म्हणजेच या या महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. खरिप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) हफ्त्याची ओढ आहे. हा हफ्ता केव्हा येईल, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

केंद्र सरकारच्या मते अनेक शेतकरी नव्याने संधी देण्यात आल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. सदर हफ्ता वितरणापूर्वी जास्तीत जास्त पात्र लाभार्थी करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. याबाबत विविध मोहीम राबविण्यात येत असून यात जास्तीत जास्त शेतकरी सहभागासाठी आवाहन करण्यात येत आहे. परिणामी पुढील हफ्ता वितरणास (PM Kisan Hafta) विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

३१ मे २०२५ पूर्वी ज्या शेतकऱ्यांची ॲग्री स्टॅकवर नोंदणी झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, असे शेतकऱ्यांना पात्र करून त्यांची यादी तयार करून या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र करण्याच्या प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन करण्यात आलेला आहे, होतं की, ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही. 

अशा शेतकऱ्यांनी त्यांनी नोंदणी करून घ्यावी. यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणूनच पीएम किसानचा पुढील हप्ता हा १५ जून नंतरच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्री स्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. 

Web Title: Latest News PM Kisan's next 20th installment weekly payment is received after 15 june 2025, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.