PM Kisan Hafta : देशातील शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसानचा १९ वा हफ्ता (PM Kisan 19th Installment) वितरित करण्यात आला आहे. अशा स्थितीत पुढील दोन हफ्त्याबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. म्हणजेच पीएम किसानच्या २० आणि २१ वा हफ्ता कोणत्या महिन्यात येऊ शकतो, या प्रश्नाचे उत्तर या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत...
पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत मिळते. या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे आहे. सरकारने २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ वा हप्ता जारी केला होता, ज्यामध्ये ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२,००० कोटी रुपये पाठवण्यात आले होते. यामध्ये २.४१ कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता.
पीएम-किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये आला होता, त्यामुळे २० वा हप्ता जून २०२५ मध्ये येण्याची अपेक्षा आहे. यानंतर २१ वा हप्ता ऑक्टोबर २०२५ मध्ये येऊ शकतो. तथापि, सरकार लवकरच त्याची अधिकृत तारीख जाहीर करेल. तत्पूर्वी जे शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, जेणेकरून त्यांना हप्ता मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
२० व्या हप्त्याची अपेक्षा
आता शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांना जून २०२५ मध्ये २० वा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, सरकारने अद्याप त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात, जे त्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये पाठवले जातात. ही योजना शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जापासून वाचवण्यास देखील मदत करते.
Jamin Kharedi : जमीन खरेदी करताना एन ए आहे का? झोन कुठला? सोबत 'या' गोष्टीही तपासा