PM Kisan Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे या योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एकूण ३.६९ लाख कोटी रुपये वितरित केले आहेत.
कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात या योजनेची माहिती दिली. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. शेतीयोग्य जमीनधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये एकूण ६ हजार रुपये डीबीटीद्वारे थेट त्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा केले जातात. तथापि, उच्च उत्पन्न गटातील काही शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी करण्यात आला. ज्यामध्ये २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली.
२० व्या हफ्त्याची प्रतीक्षा
दरम्यान २० व्या हफ्त्याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थी शेतकरी २० व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. हा हफ्ता जूनमध्ये येणार होता, मात्र आता जुलैचा शेवटचा आठवडा सुरु झाला असूनही अद्याप काही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पुढील काही दिवसांत हफ्ता वितरित होईल, असे वारंवार सांगण्यात येत आहे.