PM Kisan Update : पीएम किसानच्या (Pm Kisan Scheme) २० व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता वाढत आहे. जूनपासून शेतकरी २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबतची एक शक्यता समोर आली आहे. ती म्हणजे ९ जुलै रोजी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यावर ते पीएम किसानचा २० वा हप्ता जाहीर करू शकतात अशी अपेक्षा आहे.
गेल्या वेळी १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी करण्यात आला होता. पुढील हप्ता जुलै महिन्यातच वितरित होणार आहे. कारण सहसा प्रत्येक हप्त्यामध्ये सुमारे चार महिन्यांचे अंतर असते. अशा परिस्थितीत, फेब्रुवारींनंतर जून महिन्यात, शेतकऱ्यांना अपेक्षा होती की पीएम किसानचा २० वा हफ्त्याचा लाभ मिळेल. परंतु असे झाले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २ जुलै ते ९ जुलै दरम्यान परदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान स्वतः पीएम किसान योजनेचा हप्ता (पीएम किसान की किस्त) शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पाठवतात. त्यामुळे ९ जुलैनंतरच हप्ता जारी होईल, असा अंदाज आहे.
पात्र शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचे आणि दुरुस्त करण्याचे काम सरकार करत आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे किसान आयडी देखील तयार केले जात आहे. त्यामुळे २० वा हप्ता उशीरा येऊ शकतो. किंवा पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
या ठिकाणाहून हफ्ता वितरित होईल?
पीएम नरेंद्र मोदी बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातून पीएम किसानचा २० वा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे. कारण १८ जुलै रोजी मोदी बिहारमधील मोतिहारीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ता देखील जारी केला जाऊ शकतो. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सरकार बिहारमधून २० वा हप्ता जारी करू शकते. याबाबत अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही.