PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. बिहार निवडणुकीच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून येत्या १९ नोव्हेंबर रोजी देशातील शेतकऱ्यांना २१ व्या हफ्त्याचे पैसे मिळणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या योजनेच्या २१ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र बिहार निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा हप्ता लांबणीवर पडला होता. अखेर आज बिहार निवडणुकानंतर या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार येत्या १९ नोव्हेंबर रोजी देशातील जवळपास नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आज पीएम किसान च्या अधिकृत एक्स ट्विटर हँडल वरून २१ व्या हप्त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे.
तुम्हाला हफ्ता मिळणार की नाही, असे तपासा?
- सुरुवातीला पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/homenew.aspx अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करा. पुढील डेटा मिळवा या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला लाभार्थी स्थिती पाहायला मिळेल.
- तसेच हप्ता मिळणार की नाही याबाबतचा तपशील ही या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येईल.
