Pm Kisan Scheme : पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत २० हफ्ते वितरित करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात २० वा हफ्ता आल्यांनतर आता २१ व्या हफ्त्याची प्रतिक्षा आहे. दर चार महिन्यानंतर हा हफ्ता वितरित होत असतो. नेमका २१ वा हफ्ता कधी वितरित होऊ शकतो, हे पाहुयात...
शेवटचा, २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला. त्यावेळी सुमारे ९ कोटी पात्र शेतकऱ्यांना या हफ्ता मिळाला. डीबीटीद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये हस्तांतरित करण्यात आले. आता, शेतकऱ्यांचे २१ व्या हप्त्याकडे लक्ष आहे. सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या कोणत्या आठवड्यात २१ वा हप्ता जारी केला जाऊ शकतो?
केंद्र सरकार दर चार महिन्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत हप्ते जारी करते. ऑगस्टमध्ये जारी केलेल्या मागील हप्त्यानंतर, पुढील हप्त्याची अंतिम मुदत नोव्हेंबरमध्ये आहे. त्यामुळे, सरकार नोव्हेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात २१ वा हप्ता जारी करू शकते अशी अपेक्षा आहे.
बिहारमधील निवडणूक
बिहारमध्ये नोव्हेंबर २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्याचा सरकारचा निर्णय निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतरच शक्य आहे. त्यामुळे, बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजेच १४ नोव्हेंबरनंतर हा हप्ता जारी केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.
