Namo Shetkari Hafta : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा (माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी १९३२.७२ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सातव्या हप्त्याचा (माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे.
कृषि आयुक्तालयाने पी.एम. किसान योजनेच्या २० व्या हप्त्याच्या FTO डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ, नमो शेतकरी महासन्मान निधी योजने एकूण १९३२.७२ कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. त्यास अनुसरुन, नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय / परिपत्रकांमधील तरतूदीनुसार विहित कार्यपद्धतीने खर्च करण्याची, प्रस्तावाधीन रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत अदा करण्याची, तसेच, सदर प्रकरणी कोणतीही अनियमितता होणार नाही, याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतंर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरीत केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चित निधी व त्यावरील व्याजाची रक्कम त्या त्या वेळी शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.