Fake PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे, परंतु या योजनेच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे आणि असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला.
केरळमधील अलाप्पुझा येथील एका महिलेने पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित काही बनावट एपीके फाइल्स डाउनलोड केल्या. या द्वारे जवळपास एक लाख गमवावे लागले आहेत.
हा सर्व प्रकार मुंबईतील धारावी येथून केला जात होता, या संदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, एका व्हाट्स अँप ग्रुपवर पीएम किसान योजनेच्या बनावट एपीके फाइल्स शेअर करण्यात आल्या होत्या. ग्रुपमधील एका महिलेने लिंकवर क्लिक केले आणि फाइल्स डाउनलोड केल्या.
यामुळे तिच्या फोनवर डुप्लिकेट फाइल तयार झाली. त्यानंतर तिच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरीला गेली. त्याच दिवशी, तिचे कार्ड फ्लिपकार्टवर खरेदी करण्यासाठी वापरले गेले, ज्यामुळे अंदाजे ९६ हजार ३१२ रुपये खात्यातून काढण्यात आले.
असा पकडला मास्टरमाइंड
महिलेने तक्रार दाखल केल्यांनतर जिल्हा सायबर सेलच्या मदतीने पथकाने फ्लिपकार्टवरून खरेदीची माहिती गोळा केली. त्यानंतर पोलिसांना कळले की तडजोड केलेल्या कार्डांचा वापर करून पाच मोबाईल फोन खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आयएमईआय नंबर आणि टॉवर लोकेशन्स ट्रॅक केले, ज्यावरून हे फोन मुंबईत सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यांनतर धारावी येथून एकाला पकडण्यात आले.