PM Kisan Hafta : पीएम किसान योजनेचा २० वा (Pm Kisan 20th Installment) हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज २ ऑगस्ट रोजी सकाळी ११वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा २० वा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील साडेनऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार ५०० कोटी रुपयांची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांनाच हप्त्याची रक्कम प्राप्त होते आहे. रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला मोबाईलवर एसएमएस द्वारे माहिती देण्यात आली आहे.
असे करा चेक
- शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- या ठिकाणी फॉर्मल कॉर्नरमध्ये जाऊन बेनिफिशियरी स्टेटस वर क्लिक करा.
- या ठिकाणी आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून आपला हफ्त्याचा स्टेटस पाहता येईल.
- जर समजा स्टेटसमध्ये E kyc, Land Seedinh आणि आधार बँक सीडींग या तिन्ही ठिकाणी Yes असेल तर तुमचा हप्ता येऊन जाईल.