PM Kisan Hafta : यावर्षी देशातील बहुतांश राज्यातील शेतकऱ्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातील लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. अशातच पूर परिस्थितीत शेतीच नुकसान झालेल्या जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिला दिला आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील पूर आणि भूस्खलनामुळे बाधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान योजने) चा २१ वा हप्ता आगाऊ जारी केला. सुमारे ८.५५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १७१ कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत, ज्यात ८५ हजाराहून अधिक महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी, सरकारने पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी २१ वा हप्ता जारी केला होता. ही दोन्ही राज्ये नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहेत. पंजाबला पुराचा मोठा फटका बसला होता आणि हिमाचल प्रदेशला खराब हवामानाचा मोठा फटका बसला होता. हे लक्षात घेता, केंद्रीय कृषी मंत्रालयाने दोन्ही राज्यांसाठी पीएम किसानचा २१ वा हप्ता आगाऊ जारी केला.
दरम्यान आज, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, जम्मू आणि काश्मीरमधील ८.५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता म्हणून १७१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली जात आहे. शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पूर आणि आपत्तींमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने हा हप्ता वेळेपूर्वी जारी केला आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
मग महाराष्ट्राला का नाही .
एकीकडे महाराष्ट्रातही पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्याला उद्धवस्त केले आहे. लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. न भरून निघणारी हानी झाली आहे. कालच महाराष्ट्र सरकारने इथल्या शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मग पंजाब, हिमाचल आणि जम्मू काश्मीर प्रमाणेच महाराष्ट्रातील बाधित शेतकऱ्यांना पीएम किसानचा हफ्ता का नाही, अशी विचारणा शेतकरी वर्गाकडून होते आहे.
Read More : Forest Land : वनजमिनीत म्हणजेच फॉरेस्ट लँडमध्ये शेती करता येते का? वाचा सविस्तर