Lokmat Agro >शेतशिवार > PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हफ्ता कधी येणार? पेंडिंग हफ्त्यांचे काय? वाचा सविस्तर 

PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हफ्ता कधी येणार? पेंडिंग हफ्त्यांचे काय? वाचा सविस्तर 

Latest News PM Kisan 20th installment of PM Kisan come and pending installments Read in detail | PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हफ्ता कधी येणार? पेंडिंग हफ्त्यांचे काय? वाचा सविस्तर 

PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हफ्ता कधी येणार? पेंडिंग हफ्त्यांचे काय? वाचा सविस्तर 

PM Kisan Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजनेच्या २० व्या हफ्ता वितरणा संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

PM Kisan Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजनेच्या २० व्या हफ्ता वितरणा संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

PM Kisan Scheme : पीएम किसान (PM Kisan Yojana) अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजनेच्या २० व्या हफ्ता वितरणा संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. विसावा हप्ता हा जूनमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्याची शक्यता आहे.  शिवाय या हफ्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबतची कार्यवाही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. 

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान (Agri Minister) निधी योजनेमध्ये पात्र असलेले लाभार्थी ज्यांना हप्ते मिळत नाहीत. अशा लाभार्थ्यांची शोध मोहीम घेऊन लाभार्थ्यांची ओळख पटवून जर ते लाभार्थी हप्त्यासाठी पात्र असतील तर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा त्यांच्या कागदपत्रांच्या अडचणी असतील, त्या दूर करून त्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. 

जर काही तांत्रिक कारणामुळे या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेले असेल, हप्ते पेंडिंग असतील तर त्यांचे सर्व पेंडिंग हफ्ते सुद्धा वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यामध्ये मोहीम राबवण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यामध्ये अशा लाभार्थ्यांची यादी तयार करून ओळख पटवून त्या लाभार्थ्यांचे कागदपत्र तपासणी केली होती. त्यानुसार ज्या काही त्रुटी असतील, त्या त्रुटी दूर करून लाभार्थ्याला पात्र करण्यासाठी मोहिम राबवण्यात आलेली होती. 

परंतु आता सदर लाभार्थ्यांची ॲग्री स्टॅकवर नोंदणी झालेली असून अशा सर्व कारणामुळे येणारा जो हप्ता असणार आहे. या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पीएम किसानचा १९ वा हप्ता वितरित केला जात असताना राज्यातील 92 लाख 89 हजार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले होते.  त्यापेक्षा कित्येक तरी कमी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत हप्त्याचे वितरण करण्यात आलं होतं. 

93 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी
आता या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे बरेच सारे लाभार्थी यामध्ये वाढलेले आहेत. साधारणपणे 93 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी पुढील हप्त्यासाठी पात्र ठरणार असल्याची शक्यता आहे. आता लाभार्थ्यांच्या याद्या तपासणीसाठी आरएफटीची प्रक्रिया सुरू आहेत. 31 मे पर्यंत ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रांच्या त्रुटी दूर केल्या जात असून असे लाभार्थी सुद्धा समाविष्ट होण्याची शक्यता आहे. 31 मेपर्यंत जे लाभार्थी यामध्ये समाविष्ट होतील, अशा लाभार्थ्यांच्या संख्येसह पीएम किसानचा आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता लाभार्थ्यांना वितरीत केला जाणार आहे. 

Web Title: Latest News PM Kisan 20th installment of PM Kisan come and pending installments Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.