Strawberry cultivation : घरामागील बागेत किंवा टेरेसवर अनेक छोट्या मोठ्या फुलांची, फळांची लागवड करत असतात. जर तुम्हाला विषमुक्त स्ट्रॉबेरी वाढवायची असेल, तर काही सोप्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते.
स्ट्रॉबेरीतुन आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे मिळतात. म्हणूनच बाजारातून स्ट्रॉबेरी आणण्यापेक्षा घराच्या आजूबाजूलाच उगवता येईल.
जागेची निवड
स्ट्रॉबेरी लागवडीसाठी जागेची निवड करणे महत्वाचे असते. स्ट्रॉबेरीला सकाळचा हलका सूर्यप्रकाश आणि पुरेसा हवा पुरवठा आवश्यक असतो. शिवाय जास्त सूर्यप्रकाशही हानिकारक ठरू शकतो. म्हणून, रोप बाल्कनी, टेरेस किंवा बागेत ठेवा जिथे, त्याला ४ ते ५ तास सूर्यप्रकाश मिळू शकेल. पुरेसा सूर्यप्रकाश फुलांच्या आणि फळांच्या उत्पादनास चालना देण्यास मदत करतो.
कुठली माती निवडावी?
स्ट्रॉबेरीसाठी हलकी, सुपीक आणि चांगला निचरा होणारी माती सर्वोत्तम मानली जाते. या फळासाठी वाळू, कंपोस्ट आणि सुपीक मातीचे मिश्रण योग्य आहे. माती पाणी साचू नये याची खात्री करा, कारण यामुळे मुळांचे कुजणे होऊ शकते. मातीचा pH ५.५ ते ६.५ दरम्यान असावा.
खते आणि पोषण
स्ट्रॉबेरीच्या झाडांना चांगली फळे येण्यासाठी पोषण आवश्यक असते. तुम्ही गांडूळ खत वापरू शकता. दर महिन्याला रोपांना हलके खत दिल्याने चांगली वाढ होते.
