Pik Vima Yojana : राज्यातील खरीप हंगामात पीकविमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. एक रुपयात पीकविमा योजना बंद झाल्यानंतर केवळ ४७.७२ टक्के शेतकऱ्यांनीच योजनेत सहभाग नोंदविला आहे.(Pik Vima Yojana)
लातूर विभागातून सर्वाधिक ६६ टक्के तर कोल्हापूर विभागातून केवळ १७ टक्के सहभाग नोंदविला आहे. १४ ऑगस्ट ही अंतिम मुदत असल्याने कृषी विभागाकडून नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे.(Pik Vima Yojana)
यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेकडे प्रतिसाद लक्षणीय कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. ६ ऑगस्टपर्यंत केवळ ४७.७२ टक्के शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला असून, लातूर विभाग ६६.९९ टक्के सहभागासह आघाडीवर आहे.(Pik Vima Yojana)
'एक रुपयात पीकविमा योजना' थांबल्यानंतर घटले सहभागी
२०२३ पासून सुरू झालेल्या एक रुपयात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.
मात्र, गैरप्रकारांच्या तक्रारींनंतर २०२५ पासून ही योजना गुंडाळण्यात आली.
आता पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता स्वतः भरावा लागतो.
योजनेसाठी फार्मर आयडी व ई-पीक पाहणी सक्तीची केली आहे, तसेच बोगस विमाधारकांवर कारवाई होणार आहे.
नुकसानभरपाई पद्धतीत बदल
पूर्वी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांत कंपनीला माहिती देऊन पंचनाम्यावर भरपाई दिली जात होती. आता मात्र पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाईल, त्यामुळे 'भरपाई मिळण्याची आशा कमी' असल्याने अनेक शेतकरी दूर राहिले आहेत.
यंदाची स्थिती
आतापर्यंत ३९ लाख ३७ हजार ६२९ शेतकऱ्यांनी हप्ता भरला आहे.
५१ लाख १७ हजार ४५० हेक्टरवरील पिके संरक्षित झाली आहेत.
विभागनिहाय सहभाग
विभाग | सहभाग (%) |
---|---|
कोकण | ४५.५७ |
नाशिक | ५१.७१ |
पुणे | २७.८३ |
कोल्हापूर | १७.८३ |
छत्रपती संभाजीनगर | ५७.६९ |
लातूर | ६६.९९ |
अमरावती | ६८.८८ |
नागपूर | २१.२५ |
गतवर्षीपेक्षा मोठी घट
गतवर्षी: ७६ लाख १९ हजार ५१२ शेतकरी सहभागी
यंदा: ३९ लाख ३७ हजार ६२९ शेतकरी (६ ऑगस्टपर्यंत)
अंतिम तारीख ही आहे
१४ ऑगस्ट ही पीकविमा भरण्याची अंतिम मुदत आहे. कृषी विभागाने अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.