नाशिक : कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी डिजिटल व जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ही आहे अडचण...
पूर्वी पेन्शनधारकांची ओळख बायोमेट्रिक पद्धतीने, बोटांचे ठसे घेऊन केली जात होती. मात्र, वयोमानानुसार ठसे उमटण्यात अडचणी येत असल्याने आता चेहरा ओळख प्रणाली (फेस ऑथेंटिकेशन) वापरली जाते. या प्रक्रियेदरम्यान पेन्शनधारकाच्या चेहऱ्याचा फोटो घेतला जातो आणि त्याच्या आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येऊन ओळख पडताळणी पूर्ण केली जाते.
बँकेत जाऊनही करता येते प्रक्रिया...
राज्य सरकारी पेन्शनधारकांसाठी राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन खाते ज्या बँक शाखेत आहे, तिथे जाऊन प्रक्रिया करावी लागणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून पेन्शनधारकांची नावे, आधार क्रमांक आणि आवश्यक माहितीची यादी त्या-त्या बँकेकडे पाठविण्यात आली आहे.
पडताळणी झाल्यानंतर ती यादी परत कोषागार कार्यालयाकडे दिली जाणार आहे. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्रीय सेवेतील पेन्शनरांसाठी जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन हे दोन अॅप उपलब्ध आहेत.
जर तुमच्याकडे डिव्हाइस नसेल तर...
तर जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC), बँक शाखा, किंवा पेन्शन कार्यालयात जाऊन प्रमाणपत्र तयार करून घेऊ शकता. तेथे अधिकारी स्वतः बायोमेट्रिक तपासणी करून जीवन प्रमाण सबमिट करतात. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट १ वर्षासाठी वैध असते. दरवर्षी एकदा नवीन प्रमाणपत्र सबमिट करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे कोणती?..
पेन्शनधारकांनी बँक शाखेत येताना आधार क्रमांक, बैंक पासबुक व पीपीओ क्रमांक सोबत आणावा. आधार क्रमांकाला जोडलेला मोबाइल सोबत आणावा. कारण, त्यावर ओटीपी येतो. प्रत्यक्ष बँकेत न जाता घरी बसून जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. प्रमाणपत्र ऑनलाइन डाउनलोड करता येते. नव्या पद्धतीमुळे निवृत्तीवेतनधारकांची सोय होणार असून, त्यांना होणारा त्रास टळणार आहे.
हेही वाचा : Fake Land Documents : शेत जमिनीची खोटी कागदपत्रे कशी ओळखायची, 'ही' सोपी ट्रिक वापरा
