Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Papaya Farmer Loss : फळ पिकलं… पण नशीब रुसलं; पपई बागेवर रोटावेटरचा घाव वाचा सविस्तर

Papaya Farmer Loss : फळ पिकलं… पण नशीब रुसलं; पपई बागेवर रोटावेटरचा घाव वाचा सविस्तर

latest news Papaya Farmer Loss: The fruit ripened… but luck ran out; Rotavator damage to papaya orchard read in details | Papaya Farmer Loss : फळ पिकलं… पण नशीब रुसलं; पपई बागेवर रोटावेटरचा घाव वाचा सविस्तर

Papaya Farmer Loss : फळ पिकलं… पण नशीब रुसलं; पपई बागेवर रोटावेटरचा घाव वाचा सविस्तर

Papaya Farmer Loss : पपई झाडं फळांनी लगडून लाल-लाल झाली होती… पण बाजारात दर कोसळले आणि वाहतूकही बंद! परिणामी जळकोटच्या सचिन सुरवसे या तरुण शेतकऱ्याने लाखो रुपयांची जोमदार पपई बाग डोळ्यांत पाणी आणत रोटावेटरने मोडीत काढली. अतिवृष्टी, वाहतुकीचा अडथळा आणि दरांच्या घसरणीने कंटाळलेल्या या शेतकऱ्याची ही हृदयद्रावक कहाणी सध्या चर्चेत आहे. (Papaya Farmer Loss)

Papaya Farmer Loss : पपई झाडं फळांनी लगडून लाल-लाल झाली होती… पण बाजारात दर कोसळले आणि वाहतूकही बंद! परिणामी जळकोटच्या सचिन सुरवसे या तरुण शेतकऱ्याने लाखो रुपयांची जोमदार पपई बाग डोळ्यांत पाणी आणत रोटावेटरने मोडीत काढली. अतिवृष्टी, वाहतुकीचा अडथळा आणि दरांच्या घसरणीने कंटाळलेल्या या शेतकऱ्याची ही हृदयद्रावक कहाणी सध्या चर्चेत आहे. (Papaya Farmer Loss)

बसवराज होनाजे

पपई झाडं फळांनी लगडून लाल-लाल झाली होती… पण बाजारात दर कोसळले आणि वाहतूकही बंद. परिणामी जळकोटच्या सचिन सुरवसे या तरुण शेतकऱ्याने लाखो रुपयांची जोमदार पपई बाग डोळ्यांत पाणी आणत रोटावेटरने मोडीत काढली. (Papaya Farmer Loss)

अतिवृष्टी, वाहतुकीचा अडथळा आणि दरांच्या घसरणीने कंटाळलेल्या या शेतकऱ्याची ही हृदयद्रावक कहाणी सध्या चर्चेत आहे. (Papaya Farmer Loss)

जळकोट येथील शेतकरी सचिन सुरवसे यांनी यंदा एक एकरावर पंधरा नंबर जातीची पपई लावली होती. खत व्यवस्थापन, औषध फवारणी, ठिबक व्यवस्था सर्व काही नियोजनबद्ध केले असल्यामुळे बाग सुंदर उभी होती. पपई झाडं फळांनी अक्षरशः लगडून गेली होती. (Papaya Farmer Loss)

परंतु सततच्या अतिवृष्टीमुळे बाग साठवण तलावाजवळ असल्याने वाहतूक पूर्ण बंद होती. मजूर येत नव्हते. तोडणीचे सर्व प्रयत्न पावसामुळे थांबले. (Papaya Farmer Loss)

....पण यंदा नशिबाने दिला दगा

सचिन सुरवसे हे पारंपरिक पिकांऐवजी प्रयोगशील शेती करणारे तरुण शेतकरी. आतापर्यंत त्यांनी काकडी, कलिंगड, डांगर, कवाळ, कांदा, दुधी भोपळा अशी अनेक पिके घेत यश मिळवले होते. यंदा त्यांनी पंधरा नंबर जातीची १,२०० पपई रोपे एक एकर क्षेत्रावर लावली. योग्य खत व्यवस्थापन, औषध फवारणी, आणि संरक्षणामुळे बाग जोमाने वाढली होती.

दर कोसळले, मजूर नाही, वाहतूक नाही 

जेव्हा पावसाचे पाणी ओसरले, तेव्हा दरांमध्ये भीषण घसरण झाली. फक्त २२ रुपये किलो. या दरात तोडणीचा खर्च, मजुरी, वाहतूक कोणताही खर्च निघत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.

अखेर मन हेलावणारा निर्णय

तोडणी करून विक्री केली तर खर्च वाढणार, त्यामुळे पपई झाडाखालीच पडून सडत होती. शेजाऱ्यांनाही मोफत घेण्यास सांगितले, पण कोणी आले नाही.

वैतागलेल्या सचिन सुरवसे यांनी एक एकर बहरलेली पपई बाग रोटावेटर फिरवून मोडीत काढली.

नुकसान अंदाजे लाखो रुपयांत गेले.

रानडुक्करांसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला

रानडुक्करांचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही बसविला, रात्री शेतात मुक्काम केला. इतकं कष्ट करून उभी केलेली बाग नष्ट होताना पाहताना संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आले.

पपई झाडावर फळं जोमाने आली होती, पण मजूर आणि पावसामुळे सगळं झाडाखाली सडून पडलं. अखेर रोटावेटर फिरवताना मन हेलावलं. - रमेश सुरवसे, शेतकरी

लाखभर खर्च करून फक्त साडेतीन हजार मिळाले. निसर्गाने आमची थट्टा केली आहे.- सचिन सुरवसे, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Pokhara 2.0: 'कृषी संजीवनी'चा दुसरा टप्पा सुरू; गावांना मिळणार हवामान बदलाशी लढण्यासाठी बळ

Web Title : पपीता किसान का दुर्भाग्य: बाजार में गिरावट के बाद रोटावेटर ने पकी फसल नष्ट की।

Web Summary : गिरती कीमतों और परिवहन समस्याओं ने जलगाँव के एक किसान को अपनी पपीते की फसल को रोटावेटर से नष्ट करने के लिए मजबूर किया। भारी बारिश और मजदूरों की कमी ने जंगली सूअरों से खेत को बचाने के उनके प्रयासों के बावजूद नुकसान को बढ़ा दिया।

Web Title : Papaya farmer's misfortune: Rota-vator destroys ripe crop after market crash.

Web Summary : Falling prices and transport issues forced a Jalgaon farmer to destroy his papaya crop with a rotavator. Heavy rains and lack of laborers compounded the losses, despite his efforts to protect the farm from wild boars.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.