Papaya Benefits : पपईआरोग्यासाठी (Papaya Benefits) एक फार खास फळ मानलं जातं. पपईमध्ये (Papai) कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी9, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतात. हे सगळे तत्व शरीरासाठी फार फायदेशीर असतात. तुमची त्वचा, केस आणि पोटाच्या आरोग्यासाठीही पपईच्या बीया रामबाण उपाय आहे. तसेच याचे इतरही फायदे या लेखातुन पाहुयात....
पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे. पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरुची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात.
कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. तसेच जखम लवकर भरून येते. पचनशक्ती वाढते. भूक वाढते.
कच्च्या पपईची भाजी खाल्ल्याने करून स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. पपई मुळे यकृताला ताकद येते आणि यकृत मजबूत बनते. पपई हे जंतुनाशक फळ आहे. पोटात जर जंत झालेले असतील तर पपई खाण्यास सांगितली जाते. तसेच त्वचा मऊ ठेवण्यासाठी देखील पपई महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.
पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...