Lokmat Agro >शेतशिवार > Paddy Crop: धानाची रक्कम नाहीच; बोनस कधी पदरात पडणार? शेतकऱ्यांचा सवाल

Paddy Crop: धानाची रक्कम नाहीच; बोनस कधी पदरात पडणार? शेतकऱ्यांचा सवाल

latest news Paddy Market: There is no amount of paddy; When will the bonus be paid? Farmers' question | Paddy Crop: धानाची रक्कम नाहीच; बोनस कधी पदरात पडणार? शेतकऱ्यांचा सवाल

Paddy Crop: धानाची रक्कम नाहीच; बोनस कधी पदरात पडणार? शेतकऱ्यांचा सवाल

Paddy Crop : भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाचा पैसा थकीत असून, खरिपाचा हंगाम सुरू होत असतानाही त्यांना हमीभावाची रक्कम आणि बोनस मिळालेला नाही. बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल, या आशेने शासकीय खरेदी केंद्रावर धान दिला; पण दोन ते तीन महिने उलटूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झालेले नाहीत. (Paddy Market) वाचा सविस्तर

Paddy Crop : भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाचा पैसा थकीत असून, खरिपाचा हंगाम सुरू होत असतानाही त्यांना हमीभावाची रक्कम आणि बोनस मिळालेला नाही. बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल, या आशेने शासकीय खरेदी केंद्रावर धान दिला; पण दोन ते तीन महिने उलटूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झालेले नाहीत. (Paddy Market) वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Paddy Market : भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाचा पैसा थकीत असून, खरिपाचा हंगाम सुरू होत असतानाही त्यांना हमीभावाची रक्कम आणि बोनस मिळालेला नाही.(Paddy Market)

बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल, या आशेने शासकीय खरेदी केंद्रावर धान दिला; पण दोन ते तीन महिने उलटूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झालेले नाहीत.(Paddy Market)

परिणामी बियाणे, खते, मशागत या अत्यावश्यक तयारीसाठी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत "बोनस कधी पदरात पडणार?" हा प्रश्न अधिक तीव्रपणे विचारला जात आहे. (Paddy Market)

खरिपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असताना, भिवापूर तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. यंदा शासकीय धान खरेदीला प्राधान्य देत शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळवण्याच्या अपेक्षेने आपले धान सरकारच्या गोदामात पोहोचवले. (Paddy Market)

मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात धान विक्रीची मूळ रक्कम जमा झालेली नाही. यामुळे आता शेतकरी धानाची रक्कम नाहीच; मग बोनस कधी पदरात पडणार? असा संतप्त सवाल करत आहेत.(Paddy Market)

शासकीय खरेदी, पण पैसे नाहीत

* शासकीय धान खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत भिवापूर खरेदी-विक्री संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती.

* या अंतर्गत ३० नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. २८ फेब्रुवारीपर्यंत १ हजार २६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली, तर २३ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान ४२६ शेतकऱ्यांनी एकूण ८,३९०.८६ क्विंटल धान शासकीय केंद्रावर खरेदी झाली.

* त्यामधील फक्त ३३४ शेतकऱ्यांच्या खात्यात २८ फेब्रुवारीपर्यंत धानाची रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित ९२ शेतकऱ्यांचे तब्बल ३२ लाख ८६ हजार ४०१ रुपये अद्यापही थकित आहेत.

* दोन ते तीन महिने उलटूनही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

खरिपाचा हंगाम सुरू, पण शेतकरी पैशाविना

* मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अवकाळी मान्सूनचे आगमन झाले असून, खरिपाच्या मशागतीचे काम वेगात सुरू झाले आहे.

* खते, बियाणे, ट्रॅक्टरची भाडे यासाठी शेतकऱ्यांना त्वरित पैशांची गरज आहे. मात्र, धान विक्रीची रक्कमच न मिळाल्याने शेतकरी बँकेत वारंवार फेऱ्या मारत असूनही निराश होत आहेत.

बोनसही प्रतिक्षेतच

शासनाने यंदा दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपये हमीभाव असल्यामुळे हा पर्याय बाजारभावाच्या तुलनेत नक्कीच फायदेशीर वाटत होता. पण जेव्हा मूळ रक्कमच वेळेत मिळत नाही, तेव्हा बोनस ही केवळ घोषणा वाटते, असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.

तातडीने रक्कम जमा करा

शासकीय गोदामात धान पोहोचून २ ते ३ महिने उलटले असूनही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की, विलंब झालेल्या सर्व खात्यांमध्ये तात्काळ रक्कम जमा करावी आणि बोनसही लवकरच वितरित केला जावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शासनाने दखल घ्यावी

* यावर्षी हवामान बदल, उत्पादन खर्चात वाढ, आणि पिक नुकसानीमुळे शेतकरी आधीच संकटात आहे. त्यात शासनाने जर वेळेवर पैसेच दिले नाहीत, तर शेतकऱ्यांचा शासनावरचा विश्वास ढासळू शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन तत्काळ निधी वितरण आणि बोनस प्रक्रियेला गती द्यावी, हीच सध्याची गरज आहे.

माझ्या शेतातील २५ क्विंटल धान मी मार्च महिन्यात शासकीय खरेदी केंद्रावर दिला. अडीच महिने उलटले. मात्र, अद्यापही धानाची रक्कम खात्यात जमा झालेली नाही. मग बोनस पुढच्या वर्षी देणार का? खरिपाचा हंगाम सुरू झाला असून, शेताची मशागत, खते व बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. मात्र, शासनाकडून थानाचे पैसेच मिळाले नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.  - प्रमोद रघुशे, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : खरीप सुरू होण्याआधीच 'सीड' क्वालिटी सोयाबीनला सोन्याचा भाव! वाचा सविस्तर

Web Title: latest news Paddy Market: There is no amount of paddy; When will the bonus be paid? Farmers' question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.