चक्रधर गभणे
अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता हवामान खुलू लागल्याने मौदा तालुक्यात खरिप हंगामातील धान कापणी व बांधणीची लगबग वाढली आहे. (Paddy Harvesting)
गावागावांत शेतकऱ्यांच्या कुटुंबासह मजुरांचे जत्थे शेतावर उतरले असून, धान कापणीमुळे ग्रामीण भागात रोजगाराला मोठी चालना मिळताना दिसत आहे.(Paddy Harvesting)
धान कापणीसाठी एकरी ३ हजार, तर बांधणीसाठी २ हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. यावर्षी अवकाळी पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
धान कापणी; शेतात पुन्हा कामांची लगबग
मौदा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी धान उत्पादनावर अवलंबून आहेत. अवकाळी पावसानंतर नुकतीच परिस्थिती आटोक्यात आली आणि धान कापणी व बांधणी हंगामाला सुरुवात झाली. दिवाळीनंतर आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रमिकांची रेलचेल वाढली आहे.
पीक आडवे पडल्यानं कापणी कठीण
पाण्यामुळे लोंबीला अंकुर फुटले
शेतकरी स्वतः उतरले शेतात
मजूर तुटवडा, मजुरीत वाढ
शेतकरी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबत असून उभे पीक वाचवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत.
मजुरी दर वाढले; हाताला काम मिळाल्याने मजुरांना दिलासा
ग्रामीण भागातील महिला गटाच्या स्वरूपात कापणीसाठी उतरत आहेत.
महिलांची मजुरी : ३०० रु. प्रतिदिन
पुरुष मजूर : ४०० - ५०० रु. प्रतिदिन
१५–२० दिवस सलग काम
कापूस काढणी हंगामामुळे अनेक मजूर कापूस तोडणीला वळले असून, त्यामुळे धान कापणीसाठी मजुरांची कमतरता निर्माण झाली आहे.
महागाई वाढल्याने आमचे जगणे कठीण झाले. त्यामुळे मजुरी वाढवावीच लागते. धान कापणीमध्ये तासन्तास वाकून काम करावे लागते, बांधीला तीनदा जावे लागते. त्यामुळे मेहनतानाही योग्य मिळावा अशी अपेक्षा आहे. - वसंता टेटे, मजूर, खंडाळा, ता. मौदा
अवकाळी पावसामुळे नुकसान
अवकाळी पावसामुळे धान पिकावर तीव्र परिणाम झाला :
पिके आडवी पडली
बांधात पाणी साचले
लोंबीला अंकुर फुटले
दर्जा प्रभावित
या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची काळजी अधिकच वाढली आहे. उर्वरित पीक कसेबसे गोळा करण्याची धडपड सुरू आहे.
कष्ट करूनही भाव तेच!
शेतकऱ्यांनी सांगितले की, मजुरी वाढली, उत्पादन खर्च वाढला पण धानाला योग्य बाजारभाव मिळत नाही यामुळे शेती व्यवसाय परवडत नाही आहे. तरीही धान कापणीने ग्रामीण भागात रोजगार निर्माण झाल्याने सकारात्मक चित्र दिसत आहे.
धान कापणी-बांधणी हंगाम सुरू आहे. शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.
मजूरवर्गास रोजगार मिळत असला तरी मजुरी वाढ व मजुरांचा तुटवडा ही मोठी आव्हाने आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान पिकाचे बचाव करण्यासाठी शेतकरी व मजूर एकच घडी करून काम करताना दिसत आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Dhan Bonus : धान उत्पादकांची होरपळ; नऊ महिने थांबूनही बोनस बेपत्ता वाचा सविस्तर
