Orange Processing Center : संत्र्याचे ग्रेडिंग-कोटिंग, पॅकिंग आणि निर्यात वाढीसाठी बुलढाणा जिल्ह्यात प्रक्रिया केंद्र उभारण्याची घोषणा झाली होती. पण घोषणेला वर्षे उलटली तरी केंद्र कागदोपत्रीच आहे. (Orange Processing Center)
राज्याच्या अर्थसंकल्पात मार्च २०२३ मध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. (Orange Processing Center)
नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी यांसह बुलढाणा जिल्ह्याचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. मात्र, या घोषणेला अडीच वर्ष उलटून गेले तरी आजतागायत या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. (Orange Processing Center)
संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात हे केंद्र उभारले जाईल, अशी चर्चा होती. तथापि, प्रत्यक्ष कामाचा गाडा अजूनही रुळावर आलेला नाही. खासगी पातळीवर एक प्रक्रिया केंद्र सुरू झाले असले तरी शासकीय स्तरावरील प्रकल्प कागदोपत्रीच अडकला आहे. (Orange Processing Center)
दरम्यान, या परिसरातून रेल्वेमार्ग गेल्यामुळे पुढील दोन वर्षांत उत्तर भारतासह दक्षिण भारताची बाजारपेठ संत्रा उत्पादकांसाठी खुली होऊ शकते. परंतु, सरकारी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. (Orange Processing Center)
विदर्भात सुमारे १.५ लाख हेक्टरवर संत्र्याची लागवड आहे. त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार ५० हेक्टर फळपिकांपैकी तब्बल ५ हजार ४९३ हेक्टर (४६ टक्के क्षेत्र) संत्राखाली आहे. (Orange Processing Center)
जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर आणि लोणार हे मुख्य उत्पादन पट्टे मानले जातात. जिल्ह्यातील संत्रा बांगलादेशासह दक्षिण भारतात निर्यात होतो. आंबट व लहान संत्र्यांना तेथे मोठी मागणी आहे.
मात्र, शेतकरी असंघटित असल्यामुळे विक्री व्यवस्थापन आणि उत्पादन नियोजनाचा अभाव जाणवतो. परिणामी, शेतकऱ्यांच्या हाती फक्त मूळ किमतीचा काही टक्का हिस्सा येतो. दलाली व वजनकाट्यातील गोंधळामुळे तोटा अधिकच वाढतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
सध्या संत्र्याच्या ग्रेडिंग, कोटिंग आणि आकर्षक पॅकिंगची सुविधा बुलढाण्यात उपलब्ध नाही. नागपूरमध्ये खासगी ग्रेडिंग-कोटिंग सेंटर आहे, पण बुलढाण्यात सरकारी केंद्र सुरू झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होईल. यासोबतच कोल्ड स्टोरेज, क्रेट निर्मिती यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्यास निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तथापि, या केंद्रात नेमके काय होणार आहे? केवळ ग्रेडिंग-कोटिंग की संत्र्याचे ज्यूस, पावडर यांसारखा प्रक्रिया उद्योग उभारला जाणार का?याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. परिणामी, सरकारच्या घोषणांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
हे ही वाचा सविस्तर : मोसंबी-संत्रा पिकाला कीटकांचा धोका जाणून घ्या उपायोजना