Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Orange Nursery : सातपुड्याच्या पायथ्याशी संत्रा कलमांचा हंगाम सुरू; जंभेरी बांधकरीचा धडाका

Orange Nursery : सातपुड्याच्या पायथ्याशी संत्रा कलमांचा हंगाम सुरू; जंभेरी बांधकरीचा धडाका

latest news Orange Nursery: Orange cutting season begins at the foot of Satpura; Jambheri builders' blast | Orange Nursery : सातपुड्याच्या पायथ्याशी संत्रा कलमांचा हंगाम सुरू; जंभेरी बांधकरीचा धडाका

Orange Nursery : सातपुड्याच्या पायथ्याशी संत्रा कलमांचा हंगाम सुरू; जंभेरी बांधकरीचा धडाका

Orange Nursery : सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबू कलमांच्या जंभेरी बांधकरीच्या कामाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या या परिसरातील कलम उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. (Orange Nursery)

Orange Nursery : सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबू कलमांच्या जंभेरी बांधकरीच्या कामाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या या परिसरातील कलम उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. (Orange Nursery)

जयप्रकाश भोंडेकर 

सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी, मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा कलमांच्या जंभेरी बांधकरीच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. (Orange Nursery)

संत्रा कलमांचे उत्पादन आणि दर्जेदार रोपे यासाठी ओळखला जाणारा हा परिसर देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. (Orange Nursery)

संत्रा कलमांचे 'हब' म्हणून ओळख

शेंदूरजनाघाट परिसरातील संत्रा कलमांची बाजारपेठ देशातच नव्हे तर परदेशातही नावाजलेली आहे. याठिकाणी संत्रा, मोसंबी व लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळझाडांच्या उत्कृष्ट प्रतीच्या कलमा मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. या कलमांच्या उत्पादनासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात इडलिंबू बियांची वाफा पद्धतीने किंवा बेड पद्धतीने लागवड केली जाते.

जंभेरी रोपांची तयारी कशी होते?

इडलिंबू बियांपासून तयार होणाऱ्या रोपाला 'जंभेरी' असे म्हटले जाते. पावसाळ्यात हे जंभेरी रोप दुसऱ्या जागी लावले जाते. त्यानंतर या रोपावरील काटे काढणे, पाने पाडणे व काड्या घासणे अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बांधकरीचे काम हाती घेतले जाते.

बांधकरी म्हणजे नेमके काय?

जंभेरी रोपट्यावर संत्रा, मोसंबी किंवा लिंबूच्या झाडावरील 'डोळा' चढवणे, यालाच बांधकरी असे म्हणतात. हे डोळे साधारणतः तीन ते चार वर्षांच्या निरोगी झाडांवरून घेतले जातात. बांधकरीचे काम हे अत्यंत कौशल्याचे असून फक्त प्रशिक्षित व अनुभवी कारागीरच हे काम करतात.

अनेक गावांत काम सुरू

शेंदूरजनाघाट परिसरातील तिवसाघाट, सातनूर, वाई, रवाळा, धनोडी, पुसली, मालखेड, टेंभूरखेडा, हिवरखेड आदी गावांमध्ये सध्या जंभेरी रोपांवर बांधकरीचे काम जोरात सुरू आहे.

२१ दिवसांनी 'कातर' पाडली जाते

बांधकरी केल्यानंतर साधारणतः २१ दिवसांनी डोळ्यावर बांधलेली पट्टी काढली जाते. त्यानंतर एक आठवड्याने चढवलेला डोळा हिरवागार आहे की नाही, याची तपासणी केली जाते.

डोळा यशस्वीरीत्या जिवंत राहिल्याचे निश्चित झाल्यानंतर त्या डोळ्याच्या वर काही अंतर ठेवून फांदी कापली जाते. या प्रक्रियेला 'कातर पाडणे' असे म्हटले जाते. त्यानंतर खत, फवारणी, उखरणी व ओलित करून डोळ्यातून निघणारा अंकुर जोमाने वाढवला जातो. पुढे याच अंकुरांपासून संत्रा, मोसंबी व लिंबूच्या दर्जेदार कलमा तयार होतात.

यंदा लागवडीत घट

दरवर्षीच्या तुलनेत यंदा जंभेरी रोपांची लागवड काहीशी कमी असल्याचे चित्र आहे. यंदा संत्रा कलमांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने लागवड क्षेत्रात घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, पुढील वर्षी तरी समाधानकारक दर मिळतील आणि लागवडीत वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

संशोधन केंद्राची गरज

शेंदूरजनाघाट येथील शेतकरी व तज्ज्ञांच्या मते, लिंबूवर्गीय कलमा तयार करताना लहान मुलांप्रमाणे काळजी घ्यावी लागते. योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संशोधन मिळाल्यास हा व्यवसाय अधिक फोफावू शकतो. त्यामुळे वरूड, शेंदूरजनाघाट येथे संत्रा कलमांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी व उद्योजकांकडून होत आहे. यामुळे उत्तम प्रतीच्या संत्रा कलमा देश-विदेशात पोहोचून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : CCI in High Court : जिनिंग फॅक्टरींमध्ये किती शेतकऱ्यांनी कापूस विकला? हायकोर्टाची CCI ला थेट विचारणा

Web Title : संतरा नर्सरी: सतपुड़ा के पास संतरा कलमों का मौसम शुरू; जंभेरी ग्राफ्टिंग जोरों पर

Web Summary : सतपुड़ा की तलहटी में संतरा के पौधों के लिए जंभेरी ग्राफ्टिंग शुरू। गुणवत्ता वाले पौधों के लिए मशहूर शेंदुरजनाघाट उत्पादन की तैयारी कर रहा है। किसान इस साल रोपण में थोड़ी गिरावट के बाद बेहतर कीमतों की उम्मीद कर रहे हैं, और एक अनुसंधान केंद्र का अनुरोध कर रहे हैं।

Web Title : Orange Nursery Season Starts Near Satpuda; Jambheri Grafting in Full Swing

Web Summary : Satpuda foothills see Jambheri grafting begin for orange saplings. Shendurjanaghat, known for quality saplings, prepares for production. Farmers anticipate better prices after a slight dip in planting this year, requesting a research center.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.