नाशिक : केंद्र शासनाने रब्बी हंगाम 2025-26 साठी निश्चित केलेल्या हमीभावाने (MSP) ज्वारी, मका, बाजरी व रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी BeAM पोर्टलच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पद्धतीने ऑनलाइन शेतकरी नोंदणी प्रक्रिया दि. ०१ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी विहित मुदतीत खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया ०१ मे ते ३० जून २०२६ या कालावधीत पार पडणार असून जिल्ह्यात २२ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, बाजरी व रागी या पिकांच्या हमीभावाने विक्रीसाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील (राष्ट्रीयकृत बँक) व आधार संलग्न मोबाईल क्रमांकासह संबंधित खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीनंतर खरेदीची तारीख एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील खरेदी केंद्रे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
| 1 | येवला ता. सह. ख.वि. संघ लि., येवला |
| 2 | शेतकरी सह. संघ लि., मालेगाव |
| 2 | देवळा ता. सह. ख.वि. संघ लि., देवळा |
| 4 | लासलगाव विभाग सह. ख.वि. संघ, लासलगाव |
| 5 | कृषीसाधना म. फळे व भाजी सह. संस्था लि., विंचूर |
| 6 | सिन्नर ता. सह. ख.वि. संघ लि., सिन्नर |
| 7 | चांदवड ता. सह. खरेदी विक्री संघ लि., चांदवड |
| 8 | सटाणा (द) भाग वि.का. सह. सोसा. मर्या., सटाणा |
| 9 | नामपूर बु. विविध कार्यकारी सोसा. लि., नामपूर |
| 10 | शनैश्वर नांदगाव ता. सह. ख.वि. संघ लि., नांदगाव |
| 11 | चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था लि., रायपूर |
| 12 | आश्रय मार्केटिंग अँड प्रोसेसिंग को-ऑप सोसा. लि., खडकमाळेगाव |
| 13 | सहकार महर्षी गोंविदराव (नाना) सोनवणे वि. कार्य सेवा अंदरसूल |
| 14 | अंजनी मेंढपाळ सहकारी संस्था मर्या., साकुरीझाप, ता. मालेगाव |
| 15 | अलियाबाद आदिवासी विविध कार्य सह. संस्था मर्या., अलियाबाद ता. बागलाण |
| 16 | वीरगाव विविध कार्य सह. (विकास) सेवा संस्था मर्या., वीरगाव ता. बागलाण |
| 17 | खामलोण विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या., खामलोण ता. बागलाण |
| 18 | स्व. मोठाभाऊ अहिरे बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्या., झोडगे |
| 19 | कृषिराज शेतकरी उत्पादक सहकारी संस्था, पाटणे फाटा, मालेगाव |
| 20 | राष्ट्रीय स्वयंरोजगार व नागरी सेवा सह. संस्था मर्या., मालेगाव |
| 21 | समृद्धी बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या., देवळा |
| 22 | धोडंबा वि.का. सेवा सह. सोसा. लि., वडाळीभोई |
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे खरेदीची तारीख कळविण्यात येणार असून त्या दिवशी संबंधित खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित खरेदी केंद्राशी संपर्क साधावा, असेही प्रभारी जिल्हा पणन अधिकारी श्री. इंगळे यांनी कळविले आहे.
