Lokmat Agro >शेतशिवार > ODOP Scheme : मोठा बदल! 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी नवे दरवाजे खुले वाचा सविस्तर

ODOP Scheme : मोठा बदल! 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी नवे दरवाजे खुले वाचा सविस्तर

latest news ODOP Scheme: Big change! New doors open for food processing industries in 'One District, One Product' scheme Read in detail | ODOP Scheme : मोठा बदल! 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी नवे दरवाजे खुले वाचा सविस्तर

ODOP Scheme : मोठा बदल! 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी नवे दरवाजे खुले वाचा सविस्तर

ODOP Scheme : केंद्र सरकारने 'एक जिल्हा, एक उत्पादन' या योजनेत (ODOP Scheme) महत्त्वाचे बदल करत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा दिला आहे. जाणून घ्या काय आहेत बदल.

ODOP Scheme : केंद्र सरकारने 'एक जिल्हा, एक उत्पादन' या योजनेत (ODOP Scheme) महत्त्वाचे बदल करत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा दिला आहे. जाणून घ्या काय आहेत बदल.

शेअर :

Join us
Join usNext

ODOP Scheme : केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'एक जिल्हा, एक उत्पादन' ((ODOP Scheme) ) या धोरणात मोठे बदल करण्यात आले आहे.  (ODOP Scheme) 

या बदलामुळे केवळ एका पीकापुरते मर्यादित न राहता, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील इतर लघु व कुटीर उद्योगांनाही अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. (ODOP Scheme) 

मोसंबी फळबागास मान्यता

जालना जिल्ह्यास मोसंबी फळबागास एक पीक एक उत्पादन योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे मोसंबी फळपीक हेच जिल्ह्याची ओळख आहे. यावर अनेक शेतकऱ्यांना व प्रोड्युसर कंपन्यांना प्रक्रिया उद्योग उभारता येऊ शकतात.

आधी काय होतं?

या योजनेत पूर्वी जिल्ह्याच्या ठरावीक उत्पादनावर आधारित उद्योगांनाच प्राधान्य दिले जात होते. म्हणजे, जालना जिल्ह्यास 'मोसंबी' हे उत्पादक पीक म्हणून निवडले गेले असल्यामुळे केवळ मोसंबीवर आधारित उद्योगच या योजनेत येऊ शकत होते.

आता काय बदलले?

नवीन बदलांनुसार, कोणताही अन्नप्रक्रिया आधारित लघुउद्योग या योजनेअंतर्गत येऊ शकतो. म्हणजे जरी तुमचा व्यवसाय मोसंबीवर नसेल, तरी जर तो अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबंधित असेल, तर तुम्ही ३५% अनुदानासाठी पात्र ठरू शकता.

काय आहे अनुदान आणि त्याची मर्यादा?

* उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर ३५% अनुदान

* कमाल अनुदान मर्यादा : १० लाख रुपये

योजनेचा लाभ शेतकरी, ग्रामीण भागातील तरुण, महिला बचत गट, स्वयंसहायता गट (SHG), एफपीओ आणि सहकारी संस्था यांना मिळू शकतो.

जालन्यातील वास्तव स्थिती

* जिल्ह्यात मोसंबी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे.

* मात्र, प्रक्रियेसाठी फक्त २ उद्योग कार्यरत आहेत.

* मागील वर्षभरात ३८५ प्रस्ताव आले, त्यात ३८२ क्षेत्रांवर मोसंबी लागवड सुरू आहे.

अर्ज करताना आवश्यक अटी काय?

* उद्योग अनुभव असणे गरजेचे (अन्नप्रक्रिया क्षेत्रात).

* १८ वर्षे पूर्ण व किमान आठवी उत्तीर्ण असणे.

* कोणत्याही बँकेचा कर्जबुडवा नसावा.

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे मोसंबीपुरते मर्यादित न राहता, इतर अन्नप्रक्रिया उद्योगांनाही संधी उपलब्ध झाली आहे.- जी. आर. कापसे, जिल्हा कृषी अधिकारी 

हे ही वाचा सविस्तर : Amarvel : अमरवेलचा विळखा : पिकांची हानी, नियंत्रणासाठी 'या' करा उपायायोजना

Web Title: latest news ODOP Scheme: Big change! New doors open for food processing industries in 'One District, One Product' scheme Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.