MahaDBT Scheme : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर देयक अपलोड करण्यासाठी 30 दिवसांची मुदत पूर्वसंमती पत्रावर दिली जाते.
दरम्यान दि. ११ नोव्हेंबर २०२५ च्या कृषी संचालक, कृषी अभियांत्रिकी यांच्या पत्रानुसार पूर्वसंमती मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या मुदती मध्ये देयक अपलोड करण्याची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे तर, आता शेतकरी हे ३० दिवसांच्या मुदतीनंतरही यंत्र खरेदी करून देयक/बिल अपलोड करू शकणार आहेत.
कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषि विकास योजना (DPR Based) कृषि यांत्रिकीकरण या तीन योजना महाडीबीटी पोर्टलवर राज्यात राबविल्या जात आहेत. सन २०२५-२६ गध्ये कृषि यांत्रिकीकरण तीनही योजनेतुन विविध यंत्रे/औजरांकरीता मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.
सदर लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांना पुर्वसंमती प्रदान करण्यात आलेली आहे अशा लाभार्थ्यांनी विविध यंत्रे/औजारांची खरेदी प्रक्रीया सुरू केलेली आहे. सदर यंत्रे/औजारांची खरेदी करताना यापुर्वी लाभार्थ्यांना पुर्वसंमती प्रदान करून अनुदानासाठी देयक अपलोड करण्यासाठी ३० दिवसांची मुदत पूर्वसंमती पत्रावर दिली जात आहे.
अट सद्यस्थितीत शिथील
परंतु सद्यस्थितीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रे/औजारे यांच्या कमी उपलब्धतेमुळे लाभार्थ्यांना ३० दिवसात यंत्रे/औजारे खरेदी करता येत नसल्याचे क्षेत्रियस्तरावरून कळविण्यात आलेले आहे. तरी यास्तव आपणास कळविण्यात येत आहे की, शेतक-यांना यंत्रे/औजरांची खरेदी करण्यास विलंब होत असल्यामुळे पुर्वसंमती प्रदान केल्यानंतर ३० दिवसांच्या मुदतीगध्ये देयके अपलोड करण्याची अट सद्यस्थितीत शिथील करण्यात येत आहे.
