Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 'या' साखर कारखान्याने कामगारांची पावणे चार कोटींची पीएफ रक्कम जमा केली, वाचा सविस्तर 

'या' साखर कारखान्याने कामगारांची पावणे चार कोटींची पीएफ रक्कम जमा केली, वाचा सविस्तर 

latest News Nashik sugar factory deposited PF amount of Rs3 crores of workers, read in detail | 'या' साखर कारखान्याने कामगारांची पावणे चार कोटींची पीएफ रक्कम जमा केली, वाचा सविस्तर 

'या' साखर कारखान्याने कामगारांची पावणे चार कोटींची पीएफ रक्कम जमा केली, वाचा सविस्तर 

NSK Sugar Factory : पीएफ फंडाची तीन कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम जमा केल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

NSK Sugar Factory : पीएफ फंडाची तीन कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम जमा केल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

नाशिक : मला एक महिन्याची मुदत द्या, कामगारांची प्रायव्हेट फंडाची रक्कम तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन पंधरा दिवसांपूर्वी क्षेत्रीय आयुक्त अनिल कोतकर यांनी दिल्यानंतर शब्दाला जागत कामगारांची पीएफ फंडाची तीन कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम पीएफ फंडाच्या खात्यात जमा केल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

अनेक वर्षांपासून सदर रकमेपासून कामगार वंचित होते. वय वाढत असल्याने अनेक जण मृत्यूला सामोरे जात आहेत. मागील महिन्यात पाच कर्मचाऱ्यांचा वयोमानानुसार मृत्यू झाला. नासाका कामगारांची प्रायव्हेट फंडाची रक्कम मिळण्यासाठी कामगार नेते यांनी क्षेत्रीय आयुक्त अनिल कोटकर यांची भेट घेऊन त्या संदर्भात मागणी केली होती.

कामगारांचे वाढते वय, सद्य परिस्थिती व गरज याची कल्पना दिली होती. यावेळी कोटकर यांनी एक महिना द्या, हा प्रश्न सोडवण्याचे सांगितले होते. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या संदर्भात कामगारांची पीएफ फंडाची तीन कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम पीएफ फंडाचे खाते जमा केली. एक महिन्याच्या कालावधीमध्ये या रकमेचे कामगारांच्या खात्यात वर्ग करण्याचे काम करण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन सर्व संबंधित अधिकारी यांनी दिले आहे.

सोसायटीच्या शिल्लक रकमेचाही प्रश्न सुटणार...
प्रायव्हेट फंडाच्या रकमेचा प्रश्न सुटला, मात्र सोसायटीच्या शिल्लक रकमेचाही प्रश्न लवकरच युनियन व सर्व कामगारांना सोबत घेऊन सोडविण्यात येईल, असे विष्णुपंत गायखे यांनी स्पष्ट केले. यावेळी युनियनच्या माध्यमातून आभाराचे पत्र संबंधितांना दिले.

Web Title : चीनी मिल ने कर्मचारियों का लगभग 4 करोड़ पीएफ जमा किया

Web Summary : एक चीनी मिल ने क्षेत्रीय आयुक्त के आश्वासन के बाद कर्मचारियों के पीएफ खाते में 3.84 करोड़ रुपये जमा किए। लंबे समय से वंचित कर्मचारी खुश हैं, क्योंकि कई वृद्धावस्था और मृत्यु का सामना कर रहे थे। शेष सोसायटी निधि का मुद्दा भी जल्द ही हल किया जाएगा।

Web Title : Sugar Factory Deposits Workers' PF Amount of Nearly 40 Million

Web Summary : A sugar factory deposited ₹3.84 crore in workers' PF accounts after assurance from the Regional Commissioner. Workers, long deprived of the funds, expressed joy as many faced old age and even death. The remaining society funds issue will also be resolved soon.