Lokmat Agro >शेतशिवार > नाशिक जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांचा तिढा सुटेना, बैठकीत काय-काय घडलं? 

नाशिक जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांचा तिढा सुटेना, बैठकीत काय-काय घडलं? 

Latest News Nashik District Bank and farmers' dispute continues see details meeting | नाशिक जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांचा तिढा सुटेना, बैठकीत काय-काय घडलं? 

नाशिक जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांचा तिढा सुटेना, बैठकीत काय-काय घडलं? 

Nashik Jilha Bank : नाशिकच्या कला कालिदास मंदिरात जिल्हा बँक प्रशासन आणि शेतकरी यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली.

Nashik Jilha Bank : नाशिकच्या कला कालिदास मंदिरात जिल्हा बँक प्रशासन आणि शेतकरी यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक :  गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्हा बँक (Nashik Jilha Bank) आणि थकबाकीदार शेतकरी यांच्यात संघर्ष सुरु आहे. याबाबत एक महत्वपपूर्ण बैठक पार पडली. मात्र यावेळी संबंधित शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना बैठकीच्यावेळी नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याचवेळी  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या उपस्थितीत नामंजूर ठराव मंजूर केल्याचे मत संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

एकीकडे शेतकऱ्यांनी केलेल्या ठरावानुसार मुद्दलाचे सात ते दहा हप्ते व संपूर्ण व्याज शासनाने भरावे, असा ठराव एकमताने मंजूर केला असूनही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभा संपल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरील ठराव मंजूर झाला असल्याचे सांगितले. त्यानुसार एकरकमी परतफेड योजनेसाठी विविध व्याजदर आकारण्याचा ठराव मंजूर झाल्याचे समजल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी शेतकरी आंदोलक शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, ९३८ आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, शेतकरी समन्वय समितीचे सदस्य दिलीप पाटील, दगाजी महादू अहिरे व इतर शेतकरी आंदोलकांना भद्रकाली पोलिसांनी विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी कालिदास कला मंदिर सभागृहातून ताब्यात घेऊन विशेष सर्वसाधारण सभा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवले होते. 

शेतकऱ्यांनी केला निषेध 
सभा संपल्यानंतरच त्यांना सोडून देण्यात आल्याने त्यांनी प्रशासकांसमोर या कृतीचा निषेध केला. या कृतीमुळे शेतकरी संघटनांनी सभागृहामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना व कर्जदारांना बाहेर ठेवले. थकबाकीदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोक बाहेर ठेवण्यात आल्याबद्दलही रोष व्यक्त करण्यात आला. बिगर कर्जदार लोक सभागृहात असल्याने बिगर कर्जदार लोकांकडून ठराव मंजूर करून घेण्याच्या कृतीचा प्रशासक संतोष बिडवई यांच्यासमोर निषेध करण्यात आला.

कर्जमाफी झाल्यास भरलेली रक्कमही मिळेल परत
शासनाकडून ज्या घटकासाठी कर्जमाफी किंवा व्याजमाफी जाहीर झाली, तर ती रक्कम पात्र थकबाकीदाराने भरली असली, तरी ती त्याला तेवढीच परत केली जाईल. त्यामुळे तेवढ्या कारणासाठी रक्कम भरण्याबाबत टाळाटाळ करू नये. ती रक्कम संबंधितांना निश्चितपणे परत मिळेल, अशी हमी देत असल्याचेही विद्याधर अनास्कर यांनी या सभेत जाहीर केले.

असे आहे कर्ज परतफेडचे प्रस्तावित दर
प्रशासक बिडवई यांनी १ लाखापर्यतच्या कर्जासाठी २ टक्के, ५ लाखापर्यत ४ टक्के आणि ५ ते १० लाखापर्यतच्या कर्जासाठी ५ टक्के तर १० लाखापुढील कर्जासाठी ६ टक्के व्याज दर आकारण्याचा प्रस्ताव नव्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेत देण्यात आल्याचे सांगितले. उपरोक्त सवलतीचा लाभकर्ज एनपीए झाल्यानंतरच्या पुढील कालावधीसाठी मिळणार आहे.
 

Web Title: Latest News Nashik District Bank and farmers' dispute continues see details meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.