Namo Shetkari Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नोहेंवर २०२३ पासून सुरू केलेली आहे.
या योजनेत पात्रतेच्या अटी व शर्ती पीएम किसान योजने प्रमाणेच असून जे लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभघेण्यासाठी पात्र आहेत. त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.
- जनिनीचे प्रमाणिकरण नसणे : महसूल विभागाशी संपर्क करून जमीन (Land Seeding) करून येणे.
- ईकेवायसी (e-KYC) केलेली नसणे : स्वतः सी.एस.सी. किंवा गावातील कृषि सहाय्यकांच्या मार्फत (e-KYC) करून घेणे.
- बँक खाते आधार नसणे : बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजिकच्या पोस्टात खाते उघडणे.
- बँक खाते (DBT Enable) नसणे : बँक खाते आपार लिंक करुन पेगे किंवा नजिकच्या पोस्टात खाते उघडणे.
- आधार लिंक बैंक खाते बंद असणे : बँक खाते सुरु करून घेणे.
- बँक खात्यास दुसऱ्या कोणाचे आधार लिंक असणे : बँकेत जाऊन दुरूस्ती करुन घेणे.
- नोंदणीनंतर आधारमध्ये दुरूस्ती करणे : स्वतः किंवा सी.एस.सी. मार्फत पोर्टलवर आधार दुरुस्ती करून घेणे.
- नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा करणे : अर्ज अपात्र होणे.
- स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे : योजनेत परत लाभ पेता येणार नाही.
- विविध कारणास्तव अर्ज अपात्र (Inactive) असणे : आपण पात्र असुन ही अपात्र घोषित केले असेल तर सर्व अधिकृत पुराव्यासह (कागदपत्रे) ता.कृ.अ. कार्यालयात अर्ज करणे.
- लाभार्थी मयत झाल्यापुळे अपात्र होणे : अर्ज अपात्र होतो.
- नोंदणीनंतर जमीनीची विक्री केल्याने भूमिहीन होणे : योजनेत परत लाभ घेता येणार नाही.
- बँकाकडून व्यवहार (Transaction Failure) नाकारणे : बँकेत जाऊन चौकशी करून त्रुटी दुर करणे.
