Lokmat Agro >शेतशिवार > Mirchi Crop : मिरचीही खातेय भाव; पण, 'कोकडा'चे काय करावे राव वाचा सविस्तर

Mirchi Crop : मिरचीही खातेय भाव; पण, 'कोकडा'चे काय करावे राव वाचा सविस्तर

latest news Mirchi Crop: Chilli is also worth eating; But, what to do with 'Kokada' Read in detail | Mirchi Crop : मिरचीही खातेय भाव; पण, 'कोकडा'चे काय करावे राव वाचा सविस्तर

Mirchi Crop : मिरचीही खातेय भाव; पण, 'कोकडा'चे काय करावे राव वाचा सविस्तर

Mirchi Crop : उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड केली. मल्चिंग व ठिबक सिंचनाच्या आधारे पाणी व खत व्यवस्थापन करून मिरचीचे उत्पादन अधिक मिळावं यासाठी प्रयत्न झाले. मात्र, अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर कोकडा (Kokada) रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. वाचा सविस्तर (Mirchi Crop)

Mirchi Crop : उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड केली. मल्चिंग व ठिबक सिंचनाच्या आधारे पाणी व खत व्यवस्थापन करून मिरचीचे उत्पादन अधिक मिळावं यासाठी प्रयत्न झाले. मात्र, अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर कोकडा (Kokada) रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. वाचा सविस्तर (Mirchi Crop)

शेअर :

Join us
Join usNext

Mirchi Crop : उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड केली. मल्चिंग व ठिबक सिंचनाच्या आधारे पाणी व खत व्यवस्थापन करून मिरचीचे उत्पादन अधिक मिळावं यासाठी प्रयत्न झाले. (Mirchi Crop)

मात्र, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर कोकडा (Kokada)  रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. (Mirchi Crop)

'भाव' आहे, पण 'माल' नाही!

सध्या मिरचीला बाजारात ८० रुपये किलो तर बाजार समितीमध्ये ८ हजार रुपये क्विंटल इतका दर मिळतोय. या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसे समाधान वाटत असले, तरी कोकडा रोगामुळे आलेली उत्पादनातील घसरण हा सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरतोय.

भाव आहे, पण मिरचीला रोग झाल्यामुळे तोड फारसा मिळत नाही. दररोज औषध फवारावी लागत आहेत. त्यामुळे खर्च वाढलाय असल्याचे शेतकरी सांगतात.

कोकडा रोगाचा फटका

कोकडा रोगामुळे मिरचीची पाने आकसून जातात, झाडाला मर लागते आणि फुलं गळून पडतात. परिणामी मिरचीची वाढ खुंटते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो.

यासोबतच मिरचीवर मावा, फुलकिडे यांसारख्या किडींचाही मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी मिरचीचा रस शोषून टाकतात आणि झाडं कमकुवत होतात.

रोगावर नियंत्रणासाठी औषधांची फवारणी

कोकडा आणि इतर कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी दर ८-१० दिवसांनी फवारणी करत आहेत. यामध्ये ट्रायकोडर्मा, झायम, कार्बेन्डाझीम, सिस्टेमिक फंगीसाइड्स यांचा वापर केला जात आहे. पण हवामान ढगाळ राहिल्यामुळे फवारणीत यश येत नाही आणि खर्च मात्र वाढतोय.

मिरचीतील तण काढणे, खत देणे आणि मुळांभोवती माती चांगली करणे आवश्यक आहे. प्रारंभीला दर पंधरा दिवसांनी तण काढणे आवश्यक असते, तसेच, त्याचप्रमाणे औषध फवारणी करणे आवश्यक आहे. 

व्यवस्थापन चांगलं पण...

बहुतेक शेतकऱ्यांनी यंदा ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर केल्यामुळे पाण्याचा योग्य वापर व तण नियंत्रणात मदत झाली. पण हवामान अनुकूल नसल्याने रोगाला आळा घालणे कठीण जातंय. काही शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरच्या जागी कोरडवाहू मिरची घेतली, परंतु त्यांनाही रोगाचा सामना करावा लागतोय.

मिरचीची 'हॉट' बाजारपेठ 

वडोद तांगड्याच्या बाजारपेठेत दररोज लाखो रुपयांची मिरची खरेदी-विक्री होते. त्यामुळे स्थानिक व्यापारी, वाहतूकदार, मजूर यांनाही याचा लाभ होतो. मात्र शेतात माल तयार न झाल्यास सर्व साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Red Chilli Market: लाल मिरचीचा ठसका उतरला; जाणून घ्या काय आहे कारण

Web Title: latest news Mirchi Crop: Chilli is also worth eating; But, what to do with 'Kokada' Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.