Micro Irrigation Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'प्रति थेंब अधिक पीक' या सूक्ष्म सिंचन योजनेखाली शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. (Micro Irrigation Scheme)
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. (Micro Irrigation Scheme)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT) ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे, असे कृषी उपसंचालक ए. बी. गावडे यांनी सांगितले.(Micro Irrigation Scheme)
'प्रति थेंब अधिक पीक' योजनेचा उद्देश
या योजनेद्वारे जलसंधारण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यावर भर देण्यात आला आहे. थेंब-थेंब पाणी थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवून पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देण्याची आधुनिक पद्धत शेतकऱ्यांमध्ये रुजविणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. यामुळे केवळ पाण्याची बचतच नव्हे तर उत्पादनातही लक्षणीय वाढ होते.
पूरक अनुदानाची तरतूद
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत पूरक अनुदान मिळणार आहे.
अनुसूचित जाती व जमातीतील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पूरक अनुदान,
इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून देण्यात येणार आहे.
उर्वरित १० ते १५ टक्के अनुदानही शासनाच्या इतर पूरक योजनांद्वारे उपलब्ध होईल.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
या योजनेमुळे अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होऊन उत्पादनक्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होईल, तसेच पीक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
कृषी विभाग निवडून सूक्ष्म सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक) निवडा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा : सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आदी.
अर्ज सादर करून लाभासाठी प्रतीक्षा करा.
सूक्ष्म सिंचन पद्धतीचा प्रसार वाढल्यास जलसंधारण, पीक व्यवस्थापन आणि उत्पन्नवाढ यांना मोठी चालना मिळेल. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन स्वावलंबी आणि शाश्वत शेतीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : MahaDBT Scheme : शेतीत वाढणार कार्यक्षमता; हजारो शेतकरी सज्ज आधुनिक यंत्रांसह!
