MGNREGA Scheme : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) कामांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना निधी मंजूर केला आहे. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्याला तब्बल ११० कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.(MGNREGA Scheme)
विशेष म्हणजे, या निधीचे वितरण एसएनए स्पर्श (SNA-SPARSH) प्रणाली वापरून केले जाणार असल्याने रोहयोतील कामकाज अधिक पारदर्शक होणार असून, अनेक वर्षांपासून सुरू असलेले गैरप्रकारही मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.(MGNREGA Scheme)
एसएनए स्पर्श म्हणजे काय?
एसएनए स्पर्श ही केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने प्रस्तावित केलेली नवीन निधी वितरण प्रणाली आहे. ही प्रणाली PFMS (Public Financial Management System) आणि रिझर्व्ह बँकेच्या ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीला एकत्र करते. यामुळे निधी थेट आणि जलद गतीने वितरित
मधील सर्व मध्यस्थ टळणार
बनावट नोंदी, चुकीची एफटीओ, डुप्लिकेट मजूर यांवर अंकुश
निधी थेट मजुरांच्या खात्यात जमा
ही प्रणाली सुरू झाल्यामुळे रोहयोमधील पारदर्शकता वाढून शासनाचे नियंत्रण मजबूत होणार आहे.
निधी कसा मिळणार?
रोहयोचे काम पूर्ण झाल्यानंतर एफटीओ (Fund Transfer Order) तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी तयार करतील.
हा एफटीओ थेट आयुक्त कार्यालयाकडे पाठवला जाईल.
तेथून तो ट्रेझरीमार्गे थेट आरबीआयच्या E-Kuber प्रणालीकडे जाईल.
आरबीआयकडून रक्कम थेट मजुरांच्या खात्यात जमा होईल.
म्हणजेच मध्ये कुठेही अडथळा, विलंब किंवा गैरव्यवहार होण्याची शक्यता अत्यल्प.
जिल्ह्यातील रोहयोची सद्यस्थिती
३,५८५ रोहयो कामे सुरू
१५,८४० मजूर सध्या विविध ठिकाणी कामरत
घरकुल योजना आणि इतर बांधकामांमुळे मजुरांची मागणी वाढली
रोहयोची कामे वाढल्यामुळे आर्थिक साखळी अधिक मजबूत
सिंचन विहिरीच्या कामांना गती मिळणार
यवतमाळ जिल्ह्यात एकूण १२ हजार सिंचन विहिरी असून, त्यापैकी सुमारे ४ हजार विहिरींचे काम सुरू झाले आहे.
तूर्त ही कामे थांबलेली असली तरी उन्हाळ्यात पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. नवीन निधी वितरण प्रणालीमुळे या कामांना वेळेत मंजुरी आणि निधी उपलब्ध होणे सुलभ होणार आहे.
गैरप्रकारांना चाप
गेल्या काही वर्षांत काही ठिकाणी बनावट मजूर, कामावर नसताना हजेरी, निधीचा चुकीचा वापर, विलंबित देयके अशा तक्रारी आढळल्या होत्या.
एसएनए स्पर्श प्रणालीचा फायदा
* निधी थेट मजुरांना
* नोंदी डिजिटल आणि ऑडिटेबल
* बोगस कामगारांचे प्रमाण कमी
* पारदर्शक आणि जलद प्रक्रिया
म्हणून गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळण्याची अपेक्षा.
तज्ज्ञांचे मत
शासनातील अधिकाऱ्यांच्या मते, 'ही प्रणाली लागू झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील रोहयो कामांची गती तसेच विश्वासार्हता वाढेल. मजुरांना वेळेत मजुरी मिळेल आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार होणार नाहीत.'
