Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > MGNREGA Scheme : 'रोहयो'चा दिलासा! हजारो मजुरांना मिळणार गावातच रोजगार वाचा सविस्तर

MGNREGA Scheme : 'रोहयो'चा दिलासा! हजारो मजुरांना मिळणार गावातच रोजगार वाचा सविस्तर

latest news MGNREGA Scheme: Relief from 'Rohayo'! Thousands of laborers will get employment in the village Read in detail | MGNREGA Scheme : 'रोहयो'चा दिलासा! हजारो मजुरांना मिळणार गावातच रोजगार वाचा सविस्तर

MGNREGA Scheme : 'रोहयो'चा दिलासा! हजारो मजुरांना मिळणार गावातच रोजगार वाचा सविस्तर

MGNREGA Scheme : रोजगार हमी योजनेच्या कामांना सध्या चांगलाच वेग आला आहे. तालुक्यात ६१७ वैयक्तिक स्वरूपाची कामे सुरू असून त्यावर सुमारे चार हजार मजूर काम करत आहेत. गावातच रोजगार मिळत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना मोठा दिलासा मिळत आहे.(MGNREGA Scheme)

MGNREGA Scheme : रोजगार हमी योजनेच्या कामांना सध्या चांगलाच वेग आला आहे. तालुक्यात ६१७ वैयक्तिक स्वरूपाची कामे सुरू असून त्यावर सुमारे चार हजार मजूर काम करत आहेत. गावातच रोजगार मिळत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना मोठा दिलासा मिळत आहे.(MGNREGA Scheme)

रउफ शेख 

फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या  महात्मा गांधी रोजगार हमी योजना (MGNREGA Scheme) अंतर्गत सध्या ६१७ वैयक्तिक स्वरूपाची कामे सुरू असून त्यावर सुमारे चार हजार मजूर कार्यरत आहेत.

या कामांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध होत असला, तरी मागील सहा महिन्यांपासून सार्वजनिक स्वरूपाची कामे पूर्णपणे बंद असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. (MGNREGA Scheme)

तालुक्यात रोहयोच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी विविध वैयक्तिक स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

यामध्ये घरकुल बांधकाम, वैयक्तिक सिंचन विहिरी, फळबाग लागवड, शेततळे, शेवगा लागवड, मोहगुणी लागवड तसेच बांबू लागवड अशा कामांचा समावेश आहे. या सर्व मिळून सध्या ६१७ कामे सुरू असून त्यावर सुमारे ४ हजार ३ मजूर प्रत्यक्ष काम करत आहेत.

विशेष म्हणजे तालुक्यात सिंचन विहिरींची सर्वाधिक ३२७ कामे सुरू आहेत. त्याखालोखाल घरकुलांची २२२ कामे सुरू असून फळबाग लागवड, शेततळे, शेवगा लागवड, मोहगुणी लागवड व बांबू लागवड अशी इतर कामेही सुरू आहेत. या कामांमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असल्याचे चित्र आहे.

शेतीतील हंगामी कामे कमी असताना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच रोजगार मिळत असल्याने अनेक मजूर या कामांकडे वळले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांना काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सार्वजनिक कामे ठप्प

तालुक्यात वैयक्तिक स्वरूपाची कामे सुरू असली तरी पाणंद रस्ते, सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक यांसारखी सार्वजनिक स्वरूपाची विकासकामे मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे काही ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गावांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अशा सार्वजनिक कामांची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मागणी आल्यास कामे सुरू करणार

यासंदर्भात गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी सांगितले की, फुलंब्री तालुक्यात रोहयोतील वैयक्तिक स्वरूपाची कामे सध्या सुरू आहेत.

ग्रामपंचायतींकडून सार्वजनिक स्वरूपाच्या कामांची मागणी प्राप्त झाल्यास आवश्यकतेनुसार ती कामेही सुरू करण्यात येतील.

हे ही वाचा सविस्तर : MGNREGA Scheme : तीन महिन्यांची प्रतीक्षा संपली; मजुरांच्या खात्यात येणार मोठी रक्कम वाचा सविस्तर

अधिक वाचा :VBG RAMJI Scheme : रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर

Web Title : MGNREGA राहत: हजारों को गांव में रोजगार, विवरण अंदर

Web Summary : फुलंब्री में MGNREGA से राहत, 617 व्यक्तिगत कार्य जारी, 4,003 मजदूर कार्यरत। व्यक्तिगत परियोजनाएँ फल-फूल रही हैं, सार्वजनिक कार्य रुके। ग्रामीणों ने सार्वजनिक परियोजनाओं को फिर से शुरू करने का अनुरोध किया। अधिकारियों का कहना है कि अनुरोध पर सार्वजनिक कार्य शुरू होंगे।

Web Title : MGNREGA Relief: Thousands get village jobs, details inside.

Web Summary : MGNREGA provides relief in Phulambri, with 617 individual works ongoing, employing 4,003 laborers. While individual projects thrive, public works are stalled. Villagers request resumption of public projects. Officials state public works will start if requested.