Medicinal Plants Farming : शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी (Cultivation) सरकारने पुन्हा एकदा अनुदान योजना सुरू केली आहे. (Medicinal Plants Farming)
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (MIDH) ३३.५० लाखांचा वार्षिक कृती आराखडा मंजूर झाला असून, शेतकऱ्यांना दीड लाख रुपये प्रति हेक्टरपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.(Medicinal Plants Farming)
शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी मिळाली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (MIDH) जिल्ह्यातील ३३.५० लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Medicinal Plants Farming)
यामध्ये विशेष बाब म्हणजे औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा नवीन घटक समाविष्ट करण्यात आला असून, शेतकऱ्यांना यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.(Medicinal Plants Farming)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावा.(Medicinal Plants Farming)
पूर्वी सुरू होती योजना; पुन्हा दिली गती
राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी राज्यात २०१५–१६ ते २०१९–२० या कालावधीत ८१८.२३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, त्यासाठी शेतकऱ्यांना ४१५.१२ लाख रुपये अनुदान देण्यात आले होते.
मात्र, २०२०–२१ पासून ही योजना कृषी मंत्रालयाकडे हस्तांतरित झाल्यानंतर काही काळासाठी थांबली होती. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे.
कुठल्या वनस्पती लागवडीसाठी किती अनुदान?
योजनेत १६ प्रकारच्या औषधी व विविध सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतावर लागवडीसाठी खालीलप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे.
वनस्पतींचा प्रकार | अनुदान (प्रति हेक्टर) |
---|---|
औषधी वनस्पती | १.५० लाख रुपये |
महाग सुगंधी वनस्पती | १.२५ लाख रुपये |
इतर सुगंधी वनस्पती | ५० हजार रुपये |
योजनेतील अनुदान साधारण क्षेत्रात ४० टक्के इतके राहील. लागवड साहित्य व आयपीएम/आयआयएमचा खर्च दोन हप्त्यांत २ हेक्टरपर्यंत दिला जाईल.
या औषधी व सुगंधी वनस्पतींचा समावेश
औषधी वनस्पती : अर्जुन, असान, अशोका, बेहडा, हिरडा, बेल, टेटू, रक्तचंदन, रिठा, लोधा, शिवन, गुग्गुळ, बिब्बा, करंज, शतावरी, जेष्ठमध, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी
महाग सुगंधी वनस्पती : गुलाब, निशिगंध, रोझमेरी, जिरेनियम, चंदन, लव्हेंडर
इतर सुगंधी वनस्पती : पामरोसा, सिट्रोनेला, व्हेटीव्हर, तुळस
शेतकऱ्यांना आवाहन
ज्यांना औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करायची असेल त्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
कमी खर्चात अधिक नफा देणारी औषधी व सुगंधी शेती शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक पर्याय निर्माण करेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.