Lokmat Agro >शेतशिवार > Marathwada Crop Damage : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतं जलमय वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतं जलमय वाचा सविस्तर

latest news Marathwada Crop Damage: Heavy rains for the second consecutive day in Marathwada; Fields flooded Read in detail | Marathwada Crop Damage : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतं जलमय वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतं जलमय वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage: मराठवाड्यातील शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या कहराने हवालदिल झाले आहेत. बीड, लातूर, धाराशिव, परभणीसह ६४० गावे अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage: मराठवाड्यातील शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या कहराने हवालदिल झाले आहेत. बीड, लातूर, धाराशिव, परभणीसह ६४० गावे अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात पावसाचा कहर सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. शनिवारी अतिवृष्टीने ३२ मंडळांना झोडपल्यानंतर, रविवारीही रात्रीपासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हाल सुरूच ठेवले. (Marathwada Crop Damage)

दोन दिवसांच्या पावसामुळे १५ लाख ५४३ हेक्टरवरील पिके चिखलात गाडली असून, आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी ९३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.(Marathwada Crop Damage)

पावसाचा आकडा

रविवारी मराठवाड्यात १७.५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

बीड जिल्हा सर्वाधिक पावसाळा झालेला – ३७.१ मि.मी.

धाराशिव – २८.२ मि.मी., परभणी – २४.८ मि.मी., लातूर – २४.४ मि.मी.

बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोलीतील एकूण ३२ मंडळांत ६५ मि.मी.हून अधिक पाऊस, म्हणजेच अतिवृष्टी.

वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. पैकी मराठवाड्यात आतापर्यंत ६७६ मि.मी. पावसाची नोंद म्हणजेच ९९ टक्के, तर चार जिल्ह्यांत १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र – १५,००,५४३ हेक्टर

त्यापैकी जिरायत पिके – १४,८९,६३१ हेक्टर

बागायत पिके – ३,८६१ हेक्टर

फळबागा – ७,०७१ हेक्टर

नुकसानग्रस्त शेतकरी – १५ लाख ७८ हजारांहून अधिक

शनिवारी आणि रविवारी मिळून ६४० गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले. घाटनांद्रा परिसरात नदीला पूर आल्याने शेतकरी आणखी हवालदिल झाले.

पंचनाम्यांची प्रगती

पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्हानिहाय पंचनामे सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत एकूण ९३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, काही ठिकाणी अधिकारी शेतात जाऊन नुकसानाची नोंदणी करत आहेत.

प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले

सिल्लोड तालुक्यातील केळना नदीवरील खेळणा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

मराठवाड्यात पावसाने हजेरी लावताना शेतकऱ्यांच्या कष्टाला चिखल लावला आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यांची गती वाढवून मदत लवकर मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी, आधीच पाण्याखाली गेलेल्या पिकांसमोर पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

किती गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्हानुकसानग्रस्त शेतकरी (संख्या)
छत्रपती संभाजीनगर४,१०६
जालना२८,९४८
परभणी२,३८,५३०
हिंगोली३,०८,४७१
नांदेड७,१२,६१०
बीड१,२३,१०९
लातूर१,९०,०९७
धाराशिव१५,७८,०३३
एकूण हेक्टर नुकसान१५,००,५४३

पंचनाम्यांची टक्केवारी

जिल्हापंचनामे पूर्ण (%)
छत्रपती संभाजीनगर९२%
जालना८०%
परभणी१००%
हिंगोली१००%
नांदेड१००%
बीड१००%
लातूर८३%
धाराशिव६६%
एकूण९३%

हे ही वाचा सविस्तर :Satbara Utara Correction : शेतकऱ्यांना दिलासा: महसूल विभाग गावातच करणार सातबारा दुरुस्ती वाचा सविस्तर

Web Title: latest news Marathwada Crop Damage: Heavy rains for the second consecutive day in Marathwada; Fields flooded Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.