Mahadbt : शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (Maha DBT Portal) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. जे शेतकरी पात्र झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे कळविण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना जुने आणि नवीन अर्जाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊयात...
सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर जे काही महाडीबीटीवर (Maha dbt) जुने अर्ज केलेले आहेत. त्या जुन्या अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही महाडीबीटी फार्मर्सच्या पोर्टलवर लॉगिनसाठी गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक पर्याय दिलेला आहे. जे लाभार्थी प्रथम येण्यास प्राधान्य या तत्त्वावर ते जुने अर्ज आहेत त्यांची जी काही लाभार्थी यादी असेल, ती लाभार्थी यादी उपलब्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये जो प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे.
एक दोन तीन चार पाच अशा प्राधान्यक्रमानुसार प्रत्येक बाबीसाठी लाभार्थ्याला. लाभ दिला जाणार आहे. यामध्ये उदाहरणार्थ जर कृषी यांत्रिकीकरण असेल तर त्याची यादी वेगळी असेल. फलोत्पादनची यादी वेगळी असेल, सिंचन सुविधांची यादी वेगळी असेल किंवा इतर ज्या काही लाभाच्या योजना आहेत, त्या प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्र यादी उपलब्ध झालेली असेल.
जुन्या अर्जांमध्ये 20020-21, 22, 23, 24 मध्ये ते आलेले सर्व अर्ज उपलब्ध असून यामध्ये जसे प्राधान्य क्रम येईल, त्या ठिकाणी लक्षांक उपलब्ध होईल. तसतसे त्या लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे कळवण्यात येईल. यानंतर आता जे काही नवीन अर्ज करतील, त्या नवीन अर्ज केलेल्या पात्र झालेल्यांची यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन्ही याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
प्रोफाइल अपडेट करा
शिवाय अनेक लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कळविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पोर्टल बंद असल्याने काही अद्ययावत प्रक्रिया यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कागदपत्र अपलोड करण्याबाबत प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही.
जर तुम्हाला वैयक्तिक तपशिलांमध्ये काही बाबी समाविष्ट करावयाच्या असतील, तर त्या तुम्ही करू शकता. जसे की लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाइल अपूर्ण असल्याचे नोटिफिकेशन येत असल्याचे दिसून येते.