मारेगाव : निसर्गाचा लहरीपणा आणि शेती उत्पादनातील घट यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकरी व मजुरांना आता मारेगाव तालुक्यातील समृद्ध वनसंपदेने मोठा आधार दिला आहे.(Mahua Flower)
सध्या जंगलात मोहफुले आणि टेंभरीचा हंगाम बहरला असून, या माध्यमातून शेकडो कष्टकरी हातांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. (Mahua Flower)
पहाटेच्या अंधारात सुरू होणारी ही धावपळ ग्रामीण भागातील आर्थिक घडी बसवण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.(Mahua Flower)
पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट आणि जीवघेणी कसरत
मार्च आणि एप्रिल हे दोन महिने वनसंपदेवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
मोहाची फुले पहाटे ५ ते सकाळी ६ च्या दरम्यान गळतात. ही फुले वेचण्यासाठी बोटोणी, मार्डी, फिस्की आणि शिवानाळा परिसरातील नागरिक मध्यरात्री ३ वाजताच घराबाहेर पडतात.
जंगलात हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याची भीती असतानाही, केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करत हे कष्टकरी रानमेवा गोळा करत आहेत.
मोहाची फुले आणि 'टोय': आरोग्यासोबतच उत्पन्नाचा स्रोत
मोहाची फुले केवळ उत्पन्नाचे साधन नसून ती आरोग्यासाठीही गुणकारी मानली जातात. फुलांचा हंगाम संपल्यानंतर या झाडाला चिकूच्या आकाराची फळे येतात, ज्याला ग्रामीण भागात 'टोय' म्हटले जाते.
शुद्ध तेल निर्मिती
या टोय वाळवून त्यापासून घाण्यावर शुद्ध खाण्याचे तेल काढले जाते.
बचत गटांना चालना
या तेलाला बाजारपेठेत मोठी मागणी असून, स्थानिक महिला बचत गट या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत," असे टोयपासून तेल बनविणाऱ्या बचत गटाच्या सुनीता सातपुते यांनी सांगितले.
जंगलातील कल्पवृक्ष ठरताहेत आधारवड
मारेगाव तालुक्यातील फिस्की आणि शिवानाळा जंगलातील मोहाची व टेंभरीची झाडे खऱ्या अर्थाने स्थानिकांसाठी 'कल्पवृक्ष' ठरत आहेत.
चारोळी, टेंभर, मोहाची फुले आणि विडी पत्ता या वनोपजांमुळे मजुरांच्या हातात चार पैसे येत असून, शेतीतील नुकसानीची कसर भरून काढण्यास मदत होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : उत्पादन वाढीचा फॉर्म्युला सापडला? शेतकरी शेणखतावर भर देतायत
