Lokmat Agro >शेतशिवार > Mahila Bachat Gat :'सारथी मार्ट'मुळे महिलांच्या उद्योजकतेला नवे पंख! वाचा सविस्तर

Mahila Bachat Gat :'सारथी मार्ट'मुळे महिलांच्या उद्योजकतेला नवे पंख! वाचा सविस्तर

latest news Mahila Bachat Gat :'Sarathi Mart' gives new wings to women's entrepreneurship! Read in detail | Mahila Bachat Gat :'सारथी मार्ट'मुळे महिलांच्या उद्योजकतेला नवे पंख! वाचा सविस्तर

Mahila Bachat Gat :'सारथी मार्ट'मुळे महिलांच्या उद्योजकतेला नवे पंख! वाचा सविस्तर

Mahila Bachat Gat : ग्रामीण भागातील महिला बचतगट, नवउद्योजक व गृहउद्योग करणाऱ्या महिलांसाठी (Women) चांगली बातमी आहे. खामगाव नगरपालिकेने महिला बचतगट आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सारथी मार्ट' (Sarathi Mart) हे विशेष ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे. वाचा सविस्तर (Mahila Bachat Gat)

Mahila Bachat Gat : ग्रामीण भागातील महिला बचतगट, नवउद्योजक व गृहउद्योग करणाऱ्या महिलांसाठी (Women) चांगली बातमी आहे. खामगाव नगरपालिकेने महिला बचतगट आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सारथी मार्ट' (Sarathi Mart) हे विशेष ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे. वाचा सविस्तर (Mahila Bachat Gat)

शेअर :

Join us
Join usNext

Mahila Bachat Gat : ग्रामीण भागातील महिला बचतगट, नवउद्योजक व गृहउद्योग करणाऱ्या महिलांसाठी (Women) चांगली बातमी आहे. खामगाव नगरपालिकेने महिला बचतगट आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सारथी मार्ट' (Sarathi Mart) हे विशेष ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे. (Mahila Bachat Gat)

खामगाव नगर परिषदेच्या माध्यमातून हा एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिला बचतगट आणि स्थानिक उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.(Mahila Bachat Gat)

या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे (Digital) महिला आपल्या वस्तू व सेवा आता थेट ऑनलाइन (Online) विकू शकतील. ग्रामीण महिलांसाठी (Women) ही एक मोठी आर्थिक संधी ठरणार आहे.

नोंदणी शिबिर २० आणि २१ मे रोजी

 खामगाव नगरपालिकेच्या देशपांडे सभागृहात २० व २१ मे रोजी दुपारी १२ वाजता नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये इच्छुक बचतगट व उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

सारथी मार्ट काय देतो?

* सारथी मार्टद्वारे किराणा, कपडे, हस्तकला, गृहउद्योग उत्पादने याशिवाय प्लंबर, ब्युटिशियन, इलेक्ट्रिशियन, लॉन्ड्री, टिफिन सेवा आदींची ऑनलाइन विक्री करता येणार आहे.

* महिलांसाठी विशेष फॅशन व ट्रेंडिंग वस्तूंना देखील स्थान मिळणार आहे.

आर्थिक स्वावलंबनाची दिशा

ग्रामीण भागातील महिला बचतगटांना 'सारथी मार्ट'मुळे उत्पादन विक्रीसाठी नव्याने बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. परंपरागत स्वरूपाच्या व्यवसायाला डिजिटल मंच मिळाल्याने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, अशी अपेक्षा आहे.

अशी आहे 'सारथी मार्ट'ची वेबसाइट https://www.sarathimart.com/

हे ही वाचा सविस्तर : Umed Abhiyan: बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा झंझावात! वाचा सविस्तर

Web Title: latest news Mahila Bachat Gat :'Sarathi Mart' gives new wings to women's entrepreneurship! Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.