Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर 

आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर 

Latest news Mahavitaran Electricity Rates to Become Cheaper for Consumers Starting April 1st | आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर 

आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर 

Mahavitran : महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. 

Mahavitran : महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. 

जळगाव : महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर राज्य वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षाकरिता दरात कपात केली आहे. दि. १ एप्रिलपासून ग्राहकांना स्वस्त दराचा लाभ मिळणे सुरू होणार आहे. महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. 

त्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा एकूण ८ लाख ५ हजार ९६२ ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षाच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश दि. २५ मार्च रोजी, प्रसिद्ध केला आहे. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत.

पूर्वीपेक्षा अधिक सवलत
आयोगाने पाच वर्षांसाठी दिलेल्या आदेशापैकी १ एप्रिल २०२६ पासून दुसरे वर्ष सुरू होत आहे. परिणामी वीज ग्राहकांना यापूर्वीच्या दरापेक्षा अधिक सवलत मिळणार आहे. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. २०२२-३० या आर्थिक वर्षापर्यंत ते दरवर्षी १ एप्रिल रोजी आणखी कमी होत जातील, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उद्योग, व्यावसायिक ग्राहकांनाही लाभ...
उद्योगांना व व्यावसायिक वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत चालूच राहणार आहे. या ग्राहकांना वीज दरात एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत मिळणार आहे. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ७८ पैसे यावरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे इतका होणार आहे.

घरगुतीसाठी असा आहे बदल...
१०० युनिटपर्यंत - जुने दर - ७ रुपये ३१ पैसे तर नवे दर - ७ रुपये १० पैसे
१०१ ते ३०० उंचीपर्यंत - जुने दर - १३ रुपये १७ पैसे तर नवे दर - १२ रुपये ९४ पैसे

स्मार्ट मीटरलाही लाभ...
स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीसाठीच्या वीज वापरासाठी प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती. ती आता २०२६-२७ या आर्थिक वर्षात ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल.

Web Title : खुशखबरी! घरेलू बिजली की दरें घटीं; यहां नई दरें जांचें

Web Summary : महाराष्ट्र में बिजली की दरें पांच साल के लिए कम की गईं, 1 अप्रैल से शुरू। आवासीय, वाणिज्यिक और औद्योगिक सहित सभी उपभोक्ता श्रेणियों को लाभ। दरें 2030 तक सालाना कम होंगी। 100 यूनिट तक उपयोग पर दरें कम। स्मार्ट मीटर उपयोगकर्ताओं को ऑफ-पीक घंटों के दौरान बढ़ी हुई छूट मिलेगी।

Web Title : Good News! Domestic Electricity Prices Reduced; Check New Rates Here

Web Summary : Maharashtra electricity rates cut for five years, starting April 1st. All consumer categories benefit, including residential, commercial, and industrial. Rates will decrease annually until 2030. Reduced rates for usage up to 100 units. Smart meter users get increased discounts during off-peak hours.