Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Mahavistar AI App : शेतीसाठी मोबाईलवरच 'एआय गुरू'; 'महाविस्तार ॲप'ने लाखो शेतकऱ्यांची केली मदत

Mahavistar AI App : शेतीसाठी मोबाईलवरच 'एआय गुरू'; 'महाविस्तार ॲप'ने लाखो शेतकऱ्यांची केली मदत

latest news Mahavistar AI App: 'AI Guru' on mobile for agriculture; 'Mahavistar App' has helped lakhs of farmers | Mahavistar AI App : शेतीसाठी मोबाईलवरच 'एआय गुरू'; 'महाविस्तार ॲप'ने लाखो शेतकऱ्यांची केली मदत

Mahavistar AI App : शेतीसाठी मोबाईलवरच 'एआय गुरू'; 'महाविस्तार ॲप'ने लाखो शेतकऱ्यांची केली मदत

Mahavistar AI App : डिजिटल युगात कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. कृषी विभागाने सुरू केलेले महाविस्तार मोबाइल ॲप शेतकऱ्यांसाठी हवामान, बाजारभाव आणि योजनांची माहिती देणारे प्रभावी डिजिटल साधन बनले आहे.(Mahavistar AI App)

Mahavistar AI App : डिजिटल युगात कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. कृषी विभागाने सुरू केलेले महाविस्तार मोबाइल ॲप शेतकऱ्यांसाठी हवामान, बाजारभाव आणि योजनांची माहिती देणारे प्रभावी डिजिटल साधन बनले आहे.(Mahavistar AI App)

बापू सोळुंके

बदलत्या हवामानाचा सामना करताना शेतकऱ्यांना योग्य माहिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी कृषी विभागाने डिजिटल साधनांचा वापर वाढवला आहे.(Mahavistar AI App)

त्याचाच एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेले 'महाविस्तार' मोबाइल ॲप शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून ते आता शेतकऱ्यांचा 'एआय गुरू' म्हणून ओळखले जात असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी दिली.(Mahavistar AI App)

'लोकमत'च्या कॉफी टेबल उपक्रमांतर्गत झालेल्या संवादात विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. (Mahavistar AI App)

शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ मिळावा यासाठी गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत कृषी विभागाची सुसूत्र यंत्रणा कार्यरत आहे.(Mahavistar AI App)

शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक व फार्मर आयडीद्वारे नोंदणी

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे.

विभागात आतापर्यंत २१ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केला असून त्यापैकी १५ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली आहे.

यामुळे योजनांचे लाभ अधिक पारदर्शक पद्धतीने वितरित करणे शक्य होत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

कृषी औजारे बँक व यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन

शेतीमध्ये मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत.

कृषी औजारे बँक, पोकरा योजना तसेच महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रसामग्रीवर अनुदान दिले जाते. 

या योजनांची काटेकोर आणि पारदर्शक अंमलबजावणी व्हावी यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर वाढविण्यात आला आहे.

महाविस्तार ॲप : शेतकऱ्यांचा डिजिटल मार्गदर्शक

कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार मोबाइल ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना

हवामानाचा अंदाज

बाजारभावाची माहिती

पीक व्यवस्थापनावरील मार्गदर्शन

विविध कृषी योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया

यासारख्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.

आतापर्यंत ३ लाख ४० हजार शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून ते शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून काम करत आहे.

शेतकरी पुरस्कारासाठी आता ऑनलाइन अर्ज

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग दरवर्षी पुरस्कार देतो. यापूर्वी या पुरस्कारासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावे लागत होते. मात्र आता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी सहजपणे या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांचे काम समोर येईल, असे वानखेडे यांनी सांगितले.

कृषी अधिकाऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण

शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात असणारे सहायक कृषी अधिकारी ते तालुका कृषी अधिकारी या अधिकाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

कृषी विभागाच्या रामेती संस्थेत कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार असून यंदा सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. प्रशिक्षित अधिकारी शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करतील, असा विश्वास वानखेडे यांनी व्यक्त केला.

उत्पादनवाढीसाठी प्रयत्न

सतत बदलणारे हवामान, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील चढ-उतार या आव्हानांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर विभागाचा भर असल्याचेही वानखेडे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव आणि पीक व्यवस्थापनाची माहिती तत्काळ मिळावी यासाठी कृषी विभागाने सुरू केलेले महाविस्तार ॲप लोकप्रिय ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून लाखो शेतकरी शेतीविषयक माहिती मिळवत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : MahaKrushi Policy : शेतीत तंत्रज्ञानाची क्रांती; अकोला कृषी विद्यापीठात 'एआय' इन्क्युबेशन सेंटर

अधिक वाचा : Mahavistar AI App : एआय ॲप तयार, पण शेतकरी दूरच; डिजिटल शेतीचा प्रयोग अडखळला?

Web Title : महाविस्तार एआई ऐप: मोबाइल एआई गुरु लाखों किसानों की मदद कर रहा है

Web Summary : 'महाविस्तार' मोबाइल ऐप किसानों को मौसम की जानकारी, बाजार भाव, फसल प्रबंधन और सरकारी योजनाओं के बारे में मार्गदर्शन कर रहा है। 3.4 लाख से अधिक किसानों ने इसे डाउनलोड किया है, जो एक डिजिटल सलाहकार के रूप में कार्य कर रहा है, जिससे कृषि पद्धतियों और महत्वपूर्ण जानकारी तक पहुंच में वृद्धि हो रही है।

Web Title : Mahavistar AI App: Mobile AI Guru Helping Lakhs of Farmers

Web Summary : The 'Mahavistar' mobile app is guiding farmers with weather updates, market prices, crop management, and government schemes. Over 3.4 lakh farmers have downloaded it, acting as a digital advisor, enhancing agricultural practices and accessibility to vital information.