Lokmat Agro >शेतशिवार > Mahadbt Scheme : सौर चलित फवारणी पंपासाठी नेमकं किती अनुदान मिळतंय? वाचा सविस्तर 

Mahadbt Scheme : सौर चलित फवारणी पंपासाठी नेमकं किती अनुदान मिळतंय? वाचा सविस्तर 

Latest News mahadbt scheme How much subsidy is being given for solar powered spray pump | Mahadbt Scheme : सौर चलित फवारणी पंपासाठी नेमकं किती अनुदान मिळतंय? वाचा सविस्तर 

Mahadbt Scheme : सौर चलित फवारणी पंपासाठी नेमकं किती अनुदान मिळतंय? वाचा सविस्तर 

Mahadbt Scheme : सौर चलित फवारणी पंप घटकासाठी 100 टक्के अनुदानाबाबतची माहिती समाज माध्यमावर व्हायरल होते आहे.

Mahadbt Scheme : सौर चलित फवारणी पंप घटकासाठी 100 टक्के अनुदानाबाबतची माहिती समाज माध्यमावर व्हायरल होते आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Mahadbt Scheme : "महाडीबीटी - शेतकरी योजना" पोर्टल वर सौर चलित फवारणी पंप घटकासाठी 100 टक्के अनुदानबाबत माहिती समाज माध्यमावर व्हायरल होते आहे. त्यास अनुसरून, शेतकऱ्यांच्या माहितीसाठी "या" घटकासाठी पोर्टलवर देय असलेले अनुदान किती आणि कसे आहे? याबाबत माहिती जाणून घेऊयात.... 

महाडीबीटी पोर्टलच्या (Mahadbt Portal) माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे. यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे फवारणी पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांवर फवारणी (Favarani Pump) करण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक पंप मिळतात जे सौर ऊर्जेवर चालतात. 

दरम्यान सुरवातीला पोर्टलवर जाऊन अधिकृत रित्या अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य आहे. शिवाय पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने सोडत साठी ग्राह्य धरले जातील. सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती निवडीचा मॅसेज पाठवला जातो. 

योजेनसाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. यामध्ये फार्मर आयडी, आधार कार्ड, शेती संबंधी कागदपत्रे, बँक पासबुक, आणि इतर शासकीय ओळखपत्रे यांचा समावेश होतो. अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 

 

Nafed Kanda Kharedi : नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव ठरला! अन् बाजारात काय दर मिळतोय?

Web Title: Latest News mahadbt scheme How much subsidy is being given for solar powered spray pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.