Biyane Anudan Yojana : महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर खरीप/रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना (Seed Subsidy Scheme) उपलब्ध आहे. ज्याद्वारे सोयाबीन, भुईमुंग व इतर पिकांच्या बियाणांवर १०० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. शेतकरी MahaDBT पोर्टल वर आधार लिंक करून अर्ज करू शकतात.
उपलब्ध प्रमाणित बियाणे
सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी.
कोणाला काय लाभ?
वैयक्तिक शेतकरी प्रमाणित बियाणे वितरण - ४० ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान
नोंदणीकृत शेतकरी गट पीक प्रात्यक्षिक बियाणे - १०० टक्क्यांपर्यंत अनुदान
महत्त्वाच्या अटी
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज अनिवार्य.
2025-26 मध्ये लाभ घेतलेले शेतकरी/गट अपात्र.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, ७/१२ व ८-अ उतारा आणि जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) कागदपत्रे लागतात.
अर्ज करण्यार्ची अंतिम मुदत : १५ मे २०२६
अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टलवर भेट द्या :
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farm
अर्ज कसा करावा?
- MahaDBT पोर्टलवर जा आणि नवीन नोंदणी करा.
- लॉगिन केल्यानंतर 'कृषी योजना' विभागात जा.
- 'बियाणे' घटकाची निवड करा आणि अर्ज सबमिट करा.
- निवड झाल्यास, तुम्हाला प्री-सँक्शन लेटर मिळेल.
