Agriculture News : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया प्लँटफॉमवर एक एरर लिंक शेअर केली जात आहे. यामध्ये व्हाट्सअँपवर मोठया प्रमाणात पाठवली जात आहे. मात्र ही लिंक फसवी असून अनेकांचे खाते रिकामे झाल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने महाडीबीटीधारक शेतकऱ्यांना देखील एका खासगी कंपनीच्या या फसव्या लिंकपासुन सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत सायबर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वेगवगेळ्या माध्यमातून नागरिकांची, शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. आताही असाच काहीसा प्रकार घडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, एका कंपनीचे नाव व फ्री गिफ्ट अशा नावाची एक लिंक व्हाट्सअँपवर येत आहे. कोणत्याही अशा फेक लिंकवर क्लिक करू नका.
अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅक होऊ शकतो. लिंकवर क्लिक केले की तुमच्या मोबाईलचा पूर्ण कंट्रोल हा हॅकरकडे जातो. त्या माध्यमातून ते बँक खाते रिकामे करू शकतात. एकदा मोबाईल हॅक झाला तर हीच लिंक पुढे तुमच्या संपर्कातील सर्व कॉन्टॅक्ट/ग्रुपवरती ऑटोमॅटिक फॉरवर्ड होते.
त्यामुळे तुमच्या संपर्कातील व्यक्तींचे देखील मोबाईल हॅक होऊ शकतात. आणि जर कुणाकडून चुकून क्लिक झाले असेल तर त्वरित आपल्या फोनचे इंटरनेट बंद करावे. ॲप्समध्ये जाऊन एखादे Suspicious app (जे की तुम्ही इंस्टॉल केलेले नाही असे ) वाटत असेल तर ते Uninstall करावे, असेही महाडीबीटीकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.
