Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम', गॅस बुकिंगमध्ये एक चूक अन् खाते रिकामे, वाचा सविस्तर 

इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम', गॅस बुकिंगमध्ये एक चूक अन् खाते रिकामे, वाचा सविस्तर 

Latest News 'LPG scam' on the internet, one mistake in gas booking and account empty, read in detail | इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम', गॅस बुकिंगमध्ये एक चूक अन् खाते रिकामे, वाचा सविस्तर 

इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम', गॅस बुकिंगमध्ये एक चूक अन् खाते रिकामे, वाचा सविस्तर 

LPG Scam : आता गॅस टंचाईचा लाभ उठविण्यासाठी सायबर भामटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. 

LPG Scam : आता गॅस टंचाईचा लाभ उठविण्यासाठी सायबर भामटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. 

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता गॅस टंचाईचा लाभ उठविण्यासाठी सायबर भामटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. 

सध्या टंचाईच्या भीतीपोटी अनेक ग्राहक घाईघाईने एलपीजी सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच घाई सायबर गुन्हेगारांसाठी 'संधी' ठरत आहे. सध्या इंटरनेटवर 'एलपीजी स्कॅम'चे जाळे पसरले असून, सावध न राहिल्यास आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे.

ओटीपी, पेमेंटचा बनाव
बनावट वेबसाइट्स हुबेहूब अधिकृत कंपन्यांसारख्या दिसतात. तिथे दिलेल्या नंबरवर कॉल केल्यास समोरील व्यक्ती स्वतःला गॅस एजन्सीचा प्रतिनिधी सांगतो. बुकिंग कन्फर्म करण्यासाठी ओटीपी मागून ॲडव्हान्स पेमेंट भरण्यास सांगितले जाते. पैसे भरताच नंबर बंद होतो आणि तुमची फसवणूक होते.

कशी घ्याल काळजी?
अधिकृत ॲपचाच वापर करा :
गॅस बुकिंगसाठी नेहमी कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲप किंवा वेबसाइटचाच वापर करा.
अनोळखी लिंक टाळा : व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करून पेमेंट करू नका.
गोपनीय माहिती शेअर करू नका : अधिकृत गॅस कंपन्या फोनवर ओटीपी, पिन किंवा बैंक खात्याची माहिती मागत नाहीत.
आगाऊ रक्कम देऊ नका : अनोळखी व्यक्तीला किंवा संशयास्पद लिंकवरून आगाऊ पैसे भरू नका.
 

Web Title : एलपीजी घोटाला: गैस बुकिंग में एक गलती, खाता खाली

Web Summary : एलपीजी घोटाले से सावधान! धोखेबाज गैस एजेंसियों की नकल करते हैं, ओटीपी प्रकट करने और नकली वेबसाइटों के माध्यम से अग्रिम भुगतान करने के लिए उपयोगकर्ताओं को धोखा देते हैं। अपनी वित्तीय सुरक्षा के लिए आधिकारिक ऐप का उपयोग करें और संदिग्ध लिंक से बचें।

Web Title : LPG Scam Alert: One Gas Booking Mistake Empties Your Account

Web Summary : Beware of LPG scams! Fraudsters mimic gas agencies, tricking users into revealing OTPs and making advance payments through fake websites. Use official apps and avoid suspicious links to protect your finances.