Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > नाशिकच्या अनेक कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; ही पहा संपूर्ण यादी, व्हाट्सअँपवर करा तक्रार 

नाशिकच्या अनेक कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; ही पहा संपूर्ण यादी, व्हाट्सअँपवर करा तक्रार 

latest News Licenses of many agricultural service centers in Nashik suspended; See the complete list, file a complaint on WhatsApp | नाशिकच्या अनेक कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; ही पहा संपूर्ण यादी, व्हाट्सअँपवर करा तक्रार 

नाशिकच्या अनेक कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; ही पहा संपूर्ण यादी, व्हाट्सअँपवर करा तक्रार 

Agriculture News : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Agriculture News : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

नाशिक : २०२६ खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनांतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. 

या मोहिमेअंतर्गत त्रुटी आढळलेल्या कृषी सेवा केंद्रांची सुनावणी आज परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक यांच्या दालनात पार पडली. या सुनावणीअंती नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तपासणी मोहीम :खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची धडक तपासणी सुरु आहे.

आढळलेल्या त्रुटी : बहुतांश घाऊक व किरकोळ खते विक्रेत्यांनी e-POS आय डी वर कंपनीने दिलेले Acknowledgement वेळेत न स्वीकारल्याने त्यांच्या परवान्यावर कारवाई करण्यात आली आहे, तसेच तपासणी दरम्यान e-POS साठ्यामध्ये अनियमितता असणे, भावफलक व साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखे अद्यायावत न ठेवणे, एन फॉर्म मध्ये साठा रजिस्टर न ठेवणे, शेतकऱ्यांना एम फॉर्म मध्ये देयके न देणे. शेतकऱ्यांची बिलावर स्वाक्षरी न घेणे इत्यादी.

सुनावणी व कारवाई : संबंधित केंद्रचालकांना नोटीस बजावून आज प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक तसेच कायद्याचे उल्लघन करणारे असल्याने, परवाना अधिकारी यांनी १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. 

निलंबित केलेले कृषी सेवा केंद्राची नावे खालीप्रमाणे...

१. बालाजी अग्रो एजन्सी, वडाळी भोई ता. चांदवड
२.व्ही.एन.टेक अग्रो, भाटगाव ता. चांदवड
३. हरसूल विभाग आदिवासी सहकारी भात गिरणी लि. हरसूल ता. त्रंबकेश्वर
४. हर्षद कृषी सेवा केंद्र हरसूल ता. त्रंबकेश्वर
५. हरसूल विभाग आदिवासी जंगल कामगार सहकरी सोसायटी हरसूल ता. त्रंबकेश्वर
६. आनंद अग्रो सेंटर, देवळा
७. दिलीप सीड्स अँड फर्टीलाइझर, येवला
८. नामपूर ब्रहुत विविध कार्यकारी सोसायटी नामपूर ता. बागलाण
९. निसर्ग कृषी सेवा केंद्र निनवी ता. इगतपुरी
१०. संजय फर्टीलाइझर, कसबे वणी ता. दिंडोरी
११. श्री सद्गुरू कृषी सेवा केंद्र, हर्नुल ता. चांदवड
१२. श्री गजानन कृषी सेवा केंद्र, कनाशी ता. कळवण
१३. सुभाष एजन्सीज सटाणा ता.. बागलाण
१४. सुयश ट्रेडिंग कंपनी, नाकोडे ता. कळवण (किरकोळ खते परवाना)
१५. सुयश ट्रेडिंग कंपनी, नाकोडे ता. कळवण (घाऊक खते परवाना)
१६. वर्धमान अग्रो कंपनी, उमराणे ता. देवळा
१७. कादवा कृषी सेवा केंद्र, दिंडोरी

"शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री सहन केली जाणार नाही. ज्या कृषी सेवा केंद्रांमध्ये त्रुटी आढळतील, त्यांच्यावर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल तरी सर्व कृषी सेवा केंद्र धारकांनी कायद्याचे काटेकोर पालन करावे असे आवाहन परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना आवाहन : 
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत आणि खरेदीचे पक्के बिल आवर्जून घ्यावे. त्याचप्रमाणे खते खरेदी करतांना फार्मर आय डी द्वारेच खत खरेदी करावे. जर कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास, तात्काळ संबधित कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण व कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हास्तरावरील ७८२१०३२४०८ या क्रमांकावर Whats Up द्वारे तक्रार करावी. असे आवाहन परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने यांनी केले आहे.

Web Title : नाशिक के कृषि केंद्रों के लाइसेंस निलंबित; व्हाट्सएप पर शिकायत करें

Web Summary : खाद और बीज की बिक्री में अनियमितताओं के कारण नाशिक के सत्रह कृषि सेवा केंद्रों के लाइसेंस निलंबित। किसान व्हाट्सएप के माध्यम से उल्लंघन की रिपोर्ट कर सकते हैं।

Web Title : Licenses of Nashik Agri Centers Suspended; File Complaints on WhatsApp

Web Summary : Seventeen Nashik agri-service centers' licenses suspended due to irregularities in fertilizer and seed sales. Farmers can report violations via WhatsApp.