Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Karjmafi : कर्जमाफीच्या आशेवर वसुली थांबली? 'या' जिल्ह्यातील ७१ हजार शेतकरी डिफॉल्टर

Karjmafi : कर्जमाफीच्या आशेवर वसुली थांबली? 'या' जिल्ह्यातील ७१ हजार शेतकरी डिफॉल्टर

latest news Karjmafi: Has recovery stopped on the hope of loan waiver? 71 thousand farmers in 'this' district are defaulters | Karjmafi : कर्जमाफीच्या आशेवर वसुली थांबली? 'या' जिल्ह्यातील ७१ हजार शेतकरी डिफॉल्टर

Karjmafi : कर्जमाफीच्या आशेवर वसुली थांबली? 'या' जिल्ह्यातील ७१ हजार शेतकरी डिफॉल्टर

Karjmafi:अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वितरणातील मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ७१ हजारांहून अधिक शेतकरी कर्ज थकबाकीदार ठरले असून, कोट्यवधी रुपयांचे कर्ज अडकले आहे. मात्र, यावर बँकेकडून अद्याप कोणतीही वसुली मोहीम सुरू नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.(Karjmafi)

Karjmafi:अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वितरणातील मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ७१ हजारांहून अधिक शेतकरी कर्ज थकबाकीदार ठरले असून, कोट्यवधी रुपयांचे कर्ज अडकले आहे. मात्र, यावर बँकेकडून अद्याप कोणतीही वसुली मोहीम सुरू नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.(Karjmafi)

अमरावती : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून वितरित करण्यात आलेल्या शेती कर्जाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढल्याचे समोर आले आहे. (Karjmafi)

जिल्ह्यातील तब्बल ७१ हजार ६५५ शेतकरी सध्या कर्ज थकबाकीदार ठरले असून, बँकेकडून अद्याप कोणतीही ठोस वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Karjmafi)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या जिल्हाभरात एकूण ९४ शाखा कार्यरत आहेत.

या शाखांमार्फत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जपुरवठा केला जातो. आतापर्यंत १४ तालुक्यांतील शेतकऱ्यांना सुमारे ४४३ कोटी २७ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मात्र या कर्जावरील व्याजाची थकबाकीही मोठी असून ती तब्बल २५७ कोटी ५३ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान, बँकेकडे २६ हजार ९२७ नियमित कर्जदार खातेदार असून, हे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करत आहेत.

विशेष म्हणजे, थकबाकीदारांवर कारवाई नसतानाही अनेक प्रामाणिक कर्जदार स्वतःहून आपली थकबाकी भरत असल्याचे चित्र दिसत आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण यादी बँकेने आपल्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून ३० जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आल्याने वसुलीबाबतची प्रक्रिया सध्या ठप्प असल्याचे समजते.

कर्जमाफीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत धोरण किंवा आदेश जाहीर झालेले नसल्याने बँक प्रशासनही प्रतीक्षेच्या भूमिकेत आहे.

दरम्यान, वाढती थकबाकी आणि थांबलेली वसुली मोहीम यामुळे बँकेसमोरील आर्थिक आव्हाने अधिकच गंभीर होत असून, आगामी काळात यावर कोणते निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetkari Karjmafi : राष्ट्रीयीकृत की जिल्हा बँक? शेतकऱ्यांचे कर्ज नेमके कोणाचे माफ होणार? वाचा सविस्तर

अधिक वाचा : Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!

Web Title : कर्ज माफी की उम्मीद में वसूली रुकी; 71,000 किसान डिफ़ॉल्टर।

Web Summary : अमरावती में 71,000 से अधिक किसान करोड़ो के कर्ज में डिफ़ॉल्टर हो गए। ऋण माफी की उम्मीदों के बीच वसूली रुकी हुई है। बैंक आधिकारिक नीति का इंतजार कर रहा है, नियमित भुगतान करने वालों के बावजूद वित्तीय चुनौतियों का सामना कर रहा है।

Web Title : Loan waiver hopes stall recovery; 71,000 farmers default in Amravati.

Web Summary : Over 71,000 Amravati farmers defaulted on loans, totaling crores. Recovery is paused amid loan waiver expectations. The bank awaits official policy, facing financial challenges despite regular payers.