Lokmat Agro >शेतशिवार > कांद्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस करणार केंद्र सरकारशी चर्चा, वाचा सविस्तर 

कांद्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस करणार केंद्र सरकारशी चर्चा, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Rate Issue Chief Minister Fadnavis will discuss the onion issue with Central Government, read in detail | कांद्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस करणार केंद्र सरकारशी चर्चा, वाचा सविस्तर 

कांद्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस करणार केंद्र सरकारशी चर्चा, वाचा सविस्तर 

Kanda Rate Issue : कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी बोलणार असून, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Kanda Rate Issue : कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी बोलणार असून, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव गडगडत असून, आता तर नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात आणल्यामुळे भाव आणखी पडले आहेत.

त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नावर लक्ष घालावे, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी बोलणार असून, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. कांद्याला सरासरी १४०० ते १५०० रुपये भाव असल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याची माहिती भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली.

दर घसरण्याची शक्यता
ग्राहकांना कांदा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता या शहरांमध्ये २४ रुपये किलो या किफायतशीर दराने कांदा विक्री सुरू करण्यात आली आहे. बाजारात आवक वाढल्यास दर आणखी खाली येण्याची शक्यता असल्याच भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले. 

Web Title: Latest News Kanda Rate Issue Chief Minister Fadnavis will discuss the onion issue with Central Government, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.