नाशिक : अवकाळी पाऊस (Avkali Paus) व वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारीदेखील या परिसरात जोरदार पाऊस झाला. शेतकरी पुंडलिक बळीराम माळी यांच्या शेतातील कांद्याचे २० क्विंटल उत्पादन (Kanda Production) पावसामुळे सडल्याने त्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. कांद्याचे पीक तयार झाल्यानंतर त्यांनी कांदा उपटून शेतात झाकून ठेवला होता. मात्र, अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर झाकलेला कांदा पाण्याच्या (Kanda Damage) संपर्कात आला आणि त्यामुळे २० क्विंटल कांदा सडला.
पाऊस उघडल्यानंतर कांदा चाळीत Kanda Chal) भरताना त्याची अवस्था पाहून शेतकरी हतबल झाले. शेतकरी पुंडलिक माळी यांनी स्थानिक महसूल यंत्रणेकडे नुकसानभरपाईसाठी निवेदन दिले आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही कांदा, केळी, लिंबू, मका, ज्वारी आदी पिकांची नुकसान झाली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
नुकसानभरपाईसाठी निवेदन
दरम्यान पिंपळनेरसह साक्री तालुक्यातील कांद्याचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपये मदत द्या, अशी मागणी येथील अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांच्याकडे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह स्थानिक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यातील व पिंपळनेर परिसरातील सततच्या येणाऱ्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतकरी बांधवांचा कांदा काढून झाकून ठेवलेला कांदा पाण्याखाली गेला आणि तो पण काळपट पडला आहे. तर काही शेतकरी बांधवांचा काढलेला कांदा बाकी आहे, तो देखील पूर्णपणे खराब झाला आहे.
कृषी कार्यालयातील कर्मचारी फोन उचलत नाही, तलाठी येत नाही, जगाचा पोशिंदा कसा जगेल, अशा प्रश्न मांडत अल्प दराने कांदा विकला जातो आहे. शेतकरी बांधवांनी केलेला खर्चसुद्धा निघत नाही, याकडे सरकारचे लक्ष नाही. तर या नुकसानीचे शेतकरी बांधवांना एकरी दीड लाख रुपये मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हफ्ता कधी येणार? पेंडिंग हफ्त्यांचे काय? वाचा सविस्तर