Kanda Lagvad : सध्या कांदा रोपे टाकण्याचे काम सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा रोपे टाकून झाली आहेत. अशावेळी उत्पादन वाढविण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत कांदा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
कांदा उत्पादन वाढविण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा
- माती व वाण निवड : योग्य माती व उच्च उत्पादनक्षम वाणांची निवड.
- रोपवाटिका तयारी व पेरणी : निरोगी रोपे तयार करण्याची पद्धत, योग्य पेरणी वेळ व तंत्र.
- बीज प्रक्रिया : रोग व कीड नियंत्रणासाठी बियांची योग्य प्रक्रिया.
- खत व्यवस्थापन : अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर.
- रोग व कीड व्यवस्थापन : एकात्मिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रण.
- कापणी व साठवण : काढणी व साठवणीतील नुकसान टाळण्यासाठी योग्य तंत्रज्ञान.
अशा पद्धतीने डॉ. संतोष चव्हाण, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी मार्गदर्शन केले. कांद्याचे उत्पादन कमी असणे, तसेच रब्बी हंगामात कांद्याखालील क्षेत्र कमी असणे ही मोठी समस्या असून, कांदा पिक हे अधिक उत्पादन देणारे आहे.
या अनुषंगाने कांदा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान व कौशल्ये देऊन कांदा उत्पादनात वाढ घडवून आणणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. या प्रशिक्षणात २१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.